Naval Kishore Ram IAS | नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल होणार – पुणे महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांच्‍या अधिकाऱ्यांना सूचना

Homeadministrative

Naval Kishore Ram IAS | नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल होणार – पुणे महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांच्‍या अधिकाऱ्यांना सूचना

Ganesh Kumar Mule Dec 08, 2025 7:26 PM

Dr. Siddharth Dhende | पोतराजचे काम करणाऱ्या विक्रमच्या आयुष्यात लागणार ‘शिक्षणाचा दिवा’ | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी उचलली शिक्षणाची जबाबदारी
PMC Ward no 2 | प्रभाग २ मधील विकासकामांना आयुक्तांचा हिरवा कंदील | भरघोस निधीची तरतूद ; माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांचे यशस्वी प्रयत्न
Mukhyamantri Ladki Bahin Yoajana | लाडकी बहिण योजनेतून महिलांना आर्थिक गंडा | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांची पुणे पोलिस आयुक्तांकडे तक्रार

Naval Kishore Ram IAS | नदी पात्रात राडारोडा टाकणाऱ्यांवर गुन्‍हे दाखल होणार – पुणे महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांच्‍या अधिकाऱ्यांना सूचना

| प्रभाग क्रमांक दोन मध्ये मा उपमहापौर डाॅ सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकाराने नागरी प्रश्‍नांबाबत अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा

 

Dr Siddharth Dhende – (The Karbhari News Service) – मुळा नदी पात्रात राडारोडा टाकल्‍या प्रकरणी चौकशीसाठी समिती गठित करा. तसेच अहवाल तयार करून दोषींवर त्‍वरीत गुन्हे दाखल करा, अशा सूचना पुणे महापालिका आयुक्‍त नवलकिशोर राम यांनी पुणे महापालिकेच्‍या संबंधित अधिकाऱ्यांना दिल्‍या आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेचे माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिली. (Pune PMC News)

पुणे महापालिकेच्‍या प्रभाग क्रमांक दोन मधील विविध नागरी समस्‍यांबाबत महापालिका अधिकाऱ्यांच्‍या उपस्‍थितीत पाहणी दौरा आयोजित करण्यात आला. माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्‍या पुढाकाराने या पाहणी दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्‍या निदर्शनास आणून त्‍या त्‍वरीत मार्गी लावाव्‍यात, अशी मागणी माजी उपमहापौर डॉ. धेंडे यांनी आयुक्‍तांकडे केली. या वेळी आयुक्‍तांनी हे आदेश दिले.

या पाहणी दौऱ्यात पथ विभाग प्रमुख अनिरुद्ध पावसकर, प्रोजेक्टचे प्रमुख गोंजारी, बांधकामचे बुथकर, झोनल कमिशनर महादेव जगताप, येरवडा क्षेत्रीय कार्यालयचे सहाय्यक आयुक्त गुर्रुम आदीसह अधिकारी उपस्थित होते.  या पाहणी दौऱ्याचे आयोजन माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केले होते. या वेळी मंगेश गोळे, माजी नगरसेवक अशोक कांबळे, भगवान जाधव, माजी नगरसेविका नंदा कांबळे, निखिल गायकवाड, नानासाहेब नलावडे, गणेश बाबर, राहुल जाधव, सुधीर वाघमोडे, आसिफ शेख, राजेंद्र आल्हाट, निलेश माने आदीसह सामाजिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते.

या वेळी विविध चौक व समस्‍या निदर्शनास आणून दिल्‍या. यामध्ये आंबेडकर चौक हा सुशोभित करण्यासाठी प्रकल्‍पाचा आराखडा तयार करण्यात यावा. चौकामधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या शिल्पाजवळील स्‍वच्‍छतागृह स्‍थलांतर करावे. शिल्पा मागे टाकण्यात येणाऱ्या कचऱ्याची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावावी. अग्रेसन शाळा ते बार्टीचे कार्यालय मधील विकास आराखडा मधील २५० मिटर लांबी व दहा मिटर रुंदीचा रस्त्यांकरिता प्रस्ताव राज्यशासनाकडून दिल्ली येथील सर्वे ऑफ इंडियाकडे तात्काळ प्रस्ताव पाठविण्यात यावा. चंद्रमानगर येथिल घरांकरिता जागा राज्यांकडुन महापालिकेला हस्तांतरित करावी, हा निर्णय महसूल मंत्री चंद्रकांत बावनकुळे यांनी घेतला आहे. त्या करिता प्रस्ताव जिल्हाधिकारी मार्फत पाठविण्यात यावा.

बार्टीच्‍या शाळेसमोरील कचरा फीडर पाईंट इतरत्र स्‍थलांतरीत करा. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांचे नियोजित जागेत सर्व प्रस्ताव जिल्हाधिकारी यांना सादर करावे. बंद पडलेली बीआरटी काढून टाकावी, याकरिता प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी डॉ. धेंडे यांनी केली.

या बाबत त्‍वरीत कार्यवाही करू, असे आश्‍वासन आयुक्‍त नवलकिशोर राम यांनी लोकप्रतिनिधींना दिले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: