Pune Congress on PMC Election 2025 | पुणे  काँग्रेस कडून ब्लॉक निहाय बैठकांचे आयोजन | स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचा मानस

HomeBreaking News

Pune Congress on PMC Election 2025 | पुणे  काँग्रेस कडून ब्लॉक निहाय बैठकांचे आयोजन | स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचा मानस

Ganesh Kumar Mule Dec 06, 2025 6:01 PM

MP Girish Bapat | खासदार गिरीश बापट यांना मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याकडून श्रद्धांजली | शहरातील विविध नेत्यांच्या प्रतिक्रिया
Aundh Baner Ward Office | औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालयाच्या कर्मचाऱ्यांकडून पथनाट्या च्या माध्यमातून मतदान जनजागृती
Vilas Kanade | लघुलेखक ते अतिरिक्त महापालिका आयुक्त… एक स्वप्नवत प्रवास…! | पुणे महापालिकेच्या मिळकतकर विभागाला एका उंचीवर नेऊन ठेवण्यात महत्वाची भूमिका

Pune Congress on PMC Election 2025 | पुणे  काँग्रेस कडून ब्लॉक निहाय बैठकांचे आयोजन | स्थानिक प्रश्नांवर काम करण्याचा मानस

 

Pune Congress – (The Karbhari News Service) – आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने अध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ब्लॉक निहाय बैठकीचे आयोजन करण्यात आले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी त्यांच्या स्मृतीस अभिवादन करून आज पुणे ग्रामीण काँग्रेसचे अध्यक्ष श्रीरंग चव्‍हाण यांच्या नेतृत्वाखाली खडकवासला विधानसभा काँग्रेस पक्षाची पहिली महत्वपूर्ण आढावा बैठक पार पडली. (Pune News)

पक्ष मजबूत करण्यासाठी प्रत्येक प्रभागात सशक्त नेटवर्क तयार करणे, स्थानिक प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणे आणि जनसंपर्क वाढवणे यावर बैठकीत भर देण्यात आला. उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी निवडणूक तयारीला गती देण्याचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले की, ‘‘आगमी पुणे महानगरपालिका निवडणुकीमध्ये खडकवासला विधानसभा मतदार संघात काँग्रेस पक्षाचे अधिकाधिक उमेदवार देण्यात येतील परंतु त्यांना निवडणुक आणण्याची जबाबदारी सर्वांनी सामुहिकपणे घ्यावी. गावकी भावकी अथवा कोणत्याही दबावाला बळी न पडता काँग्रेस पक्षाचा उमेदवार म्हणून सर्वांनी मदत करणे अपेक्षित आहे. मतदार याद्यांवरती भर देऊन काम करणे आवश्यक आहे. मतदारांना लोकप्रतिनिधीकडून अथवा उमेदवाराकडून काय पाहिजे? यासाठी मतदारांपर्यंत काँग्रेस कार्यकर्ता म्हणून पोहचणे अधिक महत्वाचे आहे. खडकवासला विधानसभा मतदार संघातील जास्तीत जास्त नगरसेवक निवडणूक आणून सभागृहात नेण्याचा मानस आहे.’’

यानंतर आगामी निवडणुकीसंदर्भाती पक्ष धोरण, संघटन बांधणी, बूथस्तरावरील तयारी आणि कार्यकर्त्यांच्या सूचनांवर सविस्तर चर्चा झाली.

वरील प्रमाणेच शिवाजीनगर ब्लॉक, हडपसर ब्लॉक, भवानी ब्लॉक, कोथरूड ब्लॉक, मार्केटयार्ड ब्लॉक, पर्वती ब्लॉक, पं. नेहरू स्टेडियम ब्लॉक, येरवडा ब्लॉक, वडगांवशेरी ब्लॉक, कसबा ब्लॉक, बोपोड ब्लॉक व पुणे कॅन्टोन्मेंट ब्लॉक यामध्ये बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे.

बैठकीस काँग्रेस पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. शहर अध्यक्ष अरविंद शिंदे, ग्रामीण अध्यक्ष श्रीरंग चव्‍हाण यांच्या समवेत खडकवासला विधानसभा मुख्य समन्वयक मिलिंद पोकळे, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड, वरिष्ठ उपाध्यक्ष अजित दरेकर,  प्राची दुधाणे, अर्चना शहा, सचिन बराटे, आबा जगताप, अजय खुडे, धनंजय पाटील, प्रभाकर भोरकडे, विशाल पवार, विश्वजीत जाधव, महेश शिंदे, महादेव घुले, भुषण रानभरे आदींसह स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0