PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती | अखेर सेवा नियमावलीत करण्यात आली सुधारणा!   | मुख्य सभेने दिली मान्यता

Homeadministrative

PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती | अखेर सेवा नियमावलीत करण्यात आली सुधारणा!  | मुख्य सभेने दिली मान्यता

Ganesh Kumar Mule Nov 22, 2025 4:19 PM

Hemant Rasne | हेमंत रासने यांची सर्वोच्च न्यायालयात याचिका!
Science exhibition | शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त इऑन ग्यानांकुर विद्यालयात विज्ञान प्रदर्शन
Pune Pustak Mahotsav Record | भारताने चीनचा रेकॉर्ड मोडला

PMC Zonal Medical Officer Promotion | परिमंडळ आरोग्य अधिकारी पदोन्नती | अखेर सेवा नियमावलीत करण्यात आली सुधारणा!

| मुख्य सभेने दिली मान्यता

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाच्या पदोन्नती प्रक्रियेतील वादंग आता शमण्याची चिन्हे आहेत. कारण या पदाच्या अनुभवाच्या अटीवर जे आक्षेप घेण्यात आले होते, ते दूर करण्यात आले आहेत. शिवाय सेवा नियमावलीत सुधारणा करण्यात आली आहे. या बाबतच्या प्रस्तावाला नुकतीच महिला बाल कल्याण समिती आणि मुख्य सभेने मान्यता दिली आहे. यानुसार क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी च्या ऐवजी वैद्यकीय अधिकारी अशी अट टाकण्यात आली आहे.

दरम्यान या बाबतचे वृत्त “The Karbhari” वृत्तसंस्थेने काल प्रसारित केले होते. (PMC Zonal Medical Officer Promotion)

पुणे महापालिका आरोग्य विभागातील परिमंडळ आरोग्य अधिकारी पदाची पदोन्नती प्रक्रिया वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या पदासाठी क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदाच्या ८ वर्षाच्या अनुभवाची अट देण्यात आली होती. मात्र हे पद महापालिका सेवा नियमावलीत नाही. त्यामुळे यावर आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी यांनी आक्षेप घेतला होते.  याबाबत त्यांनी महापलिका आयुक्त यांच्याकडे तक्रार केली होती.  (Pune Municipal Corporation Health Department)

दरम्यान या पदासाठी ४ नोव्हेंबर बढती समितीची बैठक झाली होती. या बैठकीत आलेल्या तक्रारीवर म्हणजे अनुभवाच्या अटीवर चर्चा झाली. त्यामुळे महापालिका आयुक्त यांनी यावर सविस्तर अभ्यास करून आणि गरज भासल्यास सेवा नियमावलीत दुरुस्ती करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. त्यानुसार सामान्य प्रशासन विभागाने या बाबतचा प्रस्ताव महिला बाल कल्याण समितीच्या माध्यमातून मुख्य सभेसमोर ठेवला होता. या प्रस्तावाला नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे. दरम्यान हा प्रस्ताव आता राज्य सरकार कडे पाठवला जाणार आहे.

| परिमंडळ आरोग्य अधिकारी तथा सहाय्यक आरोग्य अधिकारी या पदासाठी नेमणुकीची अर्हता व नेमणुकीची प्रचलित पद्धत अशी होती. 

१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.B.B.S पदवी.

२) मनपा आस्थापनेवर कार्यरत असणारे क्षेत्रीय वैद्यकीय अधिकारी या पदांच्या कामाचा ८ वर्षांचा अनुभव असणाऱ्या अधिकाऱ्यामधून सेवाज्येष्ठतेने.

| प्रस्तावित सुधारणा अशी करण्यात आली आहे. 

१) मान्यताप्राप्त विद्यापीठातून M.B.B.S पदवी.

२) मनपा आस्थापनेवर कार्यरत असणारे वैद्यकीय अधिकारी, यापैकी ज्या वैद्यकीय अधिकारी यांना क्षेत्रीय कार्यालयाकडील  कामाचा ८ वर्षांचा किंवा ८ वर्षापेक्षा अधिक क्षेत्रीय कार्यालयाकडील कामकाजाच्या अनुभवा नुसार  सेवाज्येष्ठतेने. अशी सुधारणा करण्यात आली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0