PMC Street Art Festival | महापालिकेच्या स्ट्रीट आर्ट फेस्टिवलला कलाकारांचा चांगला प्रतिसाद 

Homeadministrative

PMC Street Art Festival | महापालिकेच्या स्ट्रीट आर्ट फेस्टिवलला कलाकारांचा चांगला प्रतिसाद 

Ganesh Kumar Mule Nov 17, 2025 8:06 PM

Lending Rates | HDFC Bank | HDFC बँकेने दिवाळीपूर्वी दिला झटका | MCLR वाढवला | ग्राहकांच्या खिशावर वाढला EMI चा भार
Ahilyabai Holkar Jayanti | अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त ‘भाजयुमो’तर्फे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत उद्या ‘युवा प्रेरणा संवाद’
PMC Solid Waste Management Department | इंदौर दौऱ्यानंतर महापालिकेच्या घनकचरा विभागाकडून तात्काळ उपाययोजना सुरु | आरोग्य निरिक्षक, वरिष्ठ आरोग्य निरीक्षकांना दिले जाणार प्रशिक्षण 

PMC Street Art Festival | महापालिकेच्या स्ट्रीट आर्ट फेस्टिवलला कलाकारांचा चांगला प्रतिसाद

 

PMC Cultural Center Department – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या अमृत महोत्सवी वर्ष ( ७५वर्षे ) आणि भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स यांच्या २५ वर्षानिमित्त पुणे महानगरपालिका सांस्कृतिक केंद्रे विभाग आणि भारती विद्यापीठाचे कॉलेज ऑफ फाईन आर्ट्स यांचे संयुक्त विद्यमाने “ आवर्तन ” स्ट्रीट आर्ट फेस्टिवलचे आयोजन जंगली महाराज रोड बालगंधर्व रंगमंदिर गेट ते छत्रपती संभाजी महाराज उद्यान गेट या पदपथाच्या जागेवर रविवार  रोजी पहाटे पाच ते रात्री नऊ या वेळेत स्ट्रीट आर्ट फेस्टिवलचे आयोजन करण्यात आलेले होते.  (Pune PMC News)

स्ट्रीट आर्ट फेस्टिवलमध्ये अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय किर्तीचे कलाकारांनी सहभाग घेतला होता. या फेस्टिवलमध्ये हस्तकला, शिल्पकला असे अनेक कलेची ५६ स्टॉल उभारण्यात आले होते. जंगली महाराज रोड या वर्दळीच्या ठिकाणी प्रथमच अशा प्रकारच्या स्ट्रीट आर्ट फेस्टिवलचे आयोजन केल्यामुळे या ठिकाणी सकाळपासून अनेक पुणेकर कलाप्रेमींनी प्रदर्शन पाहण्यास गर्दी केली होती. अनेक नामवंत कलाकारांनी या ठिकाणी भेट दिली आहे.

सदर “ आवर्तन ” स्वीट फेस्टिवल चे उद्घाटन पुणे महानगरपालिकेचच्या सांस्कृतिक केंद्रे विभागाच्या उपायुक्त श्रीमती आशा राऊत तसेच भारती विद्यापीठाचे सह. कार्यवाह डॉ. के. डी. जाधव सर, सांस्कृतिक केंद्रे विभागाचे मुख्य व्यवस्थापक राजेश कामठे, भारती विद्यापीठाच्या प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील, उपप्राचार्य रुपेश पवार यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले.

याप्रसंगी सांस्कृतिक केंद्रे विभागाच्या उपायुक्त त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच महापालिका आयुक्त  नवल किशोर राम आणि अतिरिक्त महापालिका आयुक्त (विशेष) ओमप्रकाश दिवटे यांनी सदर कार्यक्रमास शुभेच्छा दिल्याचे सांगितले. तसेच भारती विद्यापीठाचे सह. कार्यवाह डॉ. के. डी. जाधव तसेच प्राचार्या डॉ. अनुपमा पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. डॉ. गिरीश चरवाड यांनी प्रस्तावना केली आणि उपप्राचार्य रुपेश पवार यांनी आभार मानले.

सांस्कृतिक केंद्रीय विभागाचे मुख्य व्यवस्थापक तथा प्रशासन अधिकारी यांनी शुभेच्छा देताना पुणे शहरास सांस्कृतिक व ऐतिहासिक वारसा लाभला असून सदर वारसा जपण्याचे व पुढे नेण्याचे काम पुणे महानगरपालिका नेहमी करत असते. स्ट्रीट आर्ट फेस्टिवल हा त्यापैकी एक उपक्रम आहे. यापुढेही पुणे महानगरपालिका सांस्कृतिक केंद्रे विभाग असे उपक्रम सातत्याने घेणार आहे असे त्यांनी नमूद केले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: