Divisional Commissioner : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा  : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश 

HomeBreaking Newsपुणे

Divisional Commissioner : गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा  : विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश 

Ganesh Kumar Mule Nov 30, 2021 8:01 AM

G 20 summit in pune | Sinhagad Fort | G 20 परिषदेतील परदेशी पाहुणे करणार सिंहगडाची सफर!
G20 Summit in Pune |  Sinhagad Fort |  Foreign guests of the G 20 conference will visit Sinhagad Fort!
G-20 Summit Pune | जी-२० परीषदेच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठक संपन्न

गणेशखिंड रस्त्यावरील वाहतूक सुरळीत करण्यासाठी तात्काळ ‘या’ उपाययोजना करा

: विभागीय आयुक्त सौरभ राव यांचे महापालिकेला आदेश

पुणे : विद्यापीठ चौकातील प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी या रस्त्याचे रुंदीकरण करणे आवश्यक आहे. महापालिकेच्या विकास आराखड्याप्रमाणे हे रुंदीकरण करण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी आवश्यक जागा ताब्यात घेण्यावरून मात्र संभ्रम  कायम आहे.  दरम्यान याबाबत आता विभागीय आयुक्तांनी महापालिकेला आदेश दिले आहेत. त्यानुसार विद्यापीठ चौकामध्ये  प्रस्तावित असलेल्या मेट्रो सह एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी विद्यापीठ चौक व गणेशखिंड रस्त्यावरील अस्तित्वातील वाहतूक सुरळीत राहण्यासाठी पुणे महानगरपालिके मार्फत  उपाय योजनांची तत्काळ अंमलबजावणी करणे आवश्यक आहे. असे आदेशात म्हटले आहे.

: वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रुंदीकरण आवश्यक

सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौक येथे गणेशखिंड रस्त्याने होणारी वाहतूक कोंडी विचारात घेऊन व दीर्घकालीन नियोजन करणेसाठी अस्तित्वातील पूल पाडून त्याऐवजी एकाच खाबावर (Pier) दुमजली पूलाचे (वर मेट्रो व त्या खाली दुहेरी वाहतुकीचा उड्डाणपूल) बांधकाम करणेसाठी सवलतकारा सोबत करावयाच्या पूरक करारनामा मसुद्यास महाराष्ट्र शासनाच्या नगर विकास विभागाचीव अस्तित्वातील पूल तोडणेस पुणे महानगरपालिकेची मान्यता घेवून सावित्रीबाई फुले विद्यापीठ चौकातील अस्तित्वातील दोन उड्डाणपुलाचे पाडकाम माहे जुलै-ऑगस्ट २०२० या कालावधीत पूर्ण करण्यात आले आहे. प्रस्तावित दुमजली उड्डाणपुलाचे बांधकाम करतेवेळी गणेशखिंड रस्त्यावर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी प्राधिकरणामार्फत Traffic Diversion Plan तयार करण्यात आला असून सदर आराखड्यास  विभागीय आयुक्त, पुणे यांच्या अध्यक्षतेखाली दि.२६/१०/२०२१ रोजी  झालोन्या पुणे एकीकृत महानगर परिवहन प्राधिकरणाच्या बैठकीमध्ये मान्यता देण्यात आली आहे.

: या कराव्या लागणार उपाययोजना

१) विद्यापीठ चौक ते सेनापती बापट चौक या साधारणतः २५० मी लांब रस्त्याचे डाव्या बाजूचे पुणे महानगरपालिकेच्या विकास आराखड्या नुसार रुंदीकरणकरणेसाठी जमीन भूसंपादित / हस्तांतर करून घेणे, अस्तित्वातील सेवा वाहिन्यांचे  स्थलांतर करणे व आवश्यकत्या परवानग्या घेऊन सदर रस्त्याचे बांधकाम मेट्रो सवलतकार कंपनी यांच्यामार्फत करणेसाठी जागा उपलब्ध करून देणे.
२) सदर आराखड्यामधील पर्यायी रस्ते वाहतुकीसाठी खुले करण्यासाठी संबंधित संस्था किंवा विभाग यांच्याशी समन्वय साधणे व रस्ते खुले करणेची कार्यवाही करणे,
३) मंजूर करण्यात आलेल्या Traffic Diversion Plan प्रमाणे दोन वर्तुळाकार महामार्गावर वळण भागामध्ये आवश्यकतेनुसार सुधारणा (Chamfering)करणे व अतिक्रमणे काढून घेणे.
४) सेनापती बापट चोकातीलJ. W.Marriott Hotel समोरील दुभाजक काढून टाकण्यासाठी परवानगी देणे.
५) सेनापती बापट चौकामध्ये धोत्रे पथ वरून वाहने उजव्या बाजूस वळण्यासाठी J. W. Marriott Hotel समोरील Junction भागात रस्त्याचे फुटपाथ कमी रुंदीकरण करणे तसेच या भागातले आकाश चिन्हे फलक (Display / advertising board)हटवावेत.
६) संगन्ना  धोत्रे पथ व अभिमानश्री रस्ता या दोन रस्त्यावर No Parking Zoneकरावा.
७) अभिमानश्री रस्त्यावर विद्यापीठ चौक व पाषाण कडून येणारी वाहने अस्तित्वातील रस्त्याच्या दुभाजका मधून विलीन (Merging) होण्यासाठी अस्तित्वातील Divider cut ची लांबी वाढविणे.
८) रस्ता रुंदीकरणास व वाहतुकीस अडथळा निर्माण करणारे विद्युत खांब, CCTV खांब व दिशा दर्शक फलक काढून घ्यावेत.
या  उपाय योजनांची अंमलबजावणी करण्यासाठीची कार्यवाही तत्काळ पुणे महानगरपालिके मार्फत हाती घेण्यात यावी. असे आदेशात म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0