PMC Ward 20 – Bibvewadi Mahesh Society | प्रभाग क्रमांक – २० – बिबवेवाडी महेश  सोसायटी |  प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या 

Homeadministrative

PMC Ward 20 – Bibvewadi Mahesh Society | प्रभाग क्रमांक – २० – बिबवेवाडी महेश  सोसायटी |  प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या 

Ganesh Kumar Mule Sep 04, 2025 9:03 AM

Water Issue | बाणेर-बालेवाडीची पाणी समस्या एप्रिल अखेरीस सुटण्याची शक्यता | अमोल बालवडकर यांचा सातत्याने पाठपुरावा
Banking Fraud | बँकिंग फसवणुकीचा नवा मार्ग!  | आधी पैसे येतील खात्यात, मग तुमचे कष्टाचे पैसे साफ होतील | जाणून घ्या काय आहे प्रकरण?
PMC Pune Employees Award | पुणे महापालिकेच्या गुणवंत कामगार पुरस्काराचे लवकरच वितरण! | मुख्य कामगार अधिकारी शिवाजी दौंडकर यांची माहिती

PMC Ward 20 – Bibvewadi Mahesh Society | प्रभाग क्रमांक – २० – बिबवेवाडी महेश  सोसायटी |  प्रभागाची रचना आणि व्याप्ती सविस्तर जाणून घ्या

 

Pune Corporation Election 2025 – (The Karbhari News Service) – प्रभाग क्रमांक – २० म्हणजे बिबवेवाडी  महेश  सोसायटी हा प्रभाग बिबवेवाडी गावठाण पासून ते गंगाधाम परिसर पर्यंत पसरलेला आहे. ८२ हजार २९९ लोकसंख्येचा हा प्रभाग आहे. प्रभागाची व्याप्ती, रचना आपण सविस्तर जाणून घेऊयात. (Pune Municipal Corporation (PMC)  – 2025)

 

 

प्रभाग क्रमांक – २० – बिबवेवाडी महेश  सोसायटी

लोकसंख्या – एकूण -८२२९९ – अ. जा. ८३७२ – अ.ज. – ५१४

निवडून द्यायच्या सदस्यांची संख्या – ४

 

व्याप्ती: बिबवेवाडी गांवठाण, महेश सोसायटी, यश लॉन, शंकर महाराज मठ, लोअर इंदिरानगर, चिंतामणराव देशमुख प्राथमिक शाळा, ट्रक टर्मिनस, के. के. मार्केट, अयोध्या सोसायटी, उत्सव इमारत, अरिहंत सोसायटी, ऋतुराज सोसायटी परिसर, पंचदीप भवन (राज्य कामगार विमा महामंडळ) पारिजात सोसायटी, वसंत विहार सोसायटी, राजमाता कॉम्प्लेक्स, गंगाधाम परिसर, पापळ वस्ती, पारसी कॉलनी इ.

उत्तर: पुणे सातारा रस्ता शिवनेरी रस्त्यास जेथे मिळतो. तेथून पूर्वेस शिवनेरी रस्त्याने सूर्यप्रकाश सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने व पुढे प्रेम नगर सोसायटी आणि अनिकेत सोसायटी यांच्या पूर्वेकडील हद्दीने कुमार सिद्धांचल सोसायटीच्या दक्षिणेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून पूर्वेस सदर रस्त्याने व पुढे पूर्वेस डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या दक्षिणेकडील हद्दीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून उत्तरेस सदर हद्दीने नॅशनल सीड्स कॉर्पोरेशनच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पूर्वेस सदर हद्दीने वास्तूनगर सोसायटीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने बिबवेवाडी कोंढवा रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पूर्वेस बिबवेवाडी कोंढवा रस्त्याने केशवराव सिताराम ठाकरे रस्त्याने (बिबवेवाडी- कोंढवा रस्ता) रायफल रेंजच्या पश्चिमेकडील हद्दीस मिळेपर्यंत.

पुर्वः केशवराव सिताराम ठाकरे रस्ता (बिबवेवाडी-कोंढवा रस्ता ) रायफल रेंजच्या पश्चिमेकडील हद्दीस जेथे मिळतो तेथून दक्षिणेस सदर हद्दीने गोयल गार्डनच्या उत्तरेकडील रस्त्यास (स.नं.६२० बिबवेवाडी, अमोल सोसायटी प्लॉट नं. बी २ च्या दक्षिणेकडील रस्ता (पायवाट) मिळेपर्यंत.

दक्षिणः रायफल रेंजची हद्द गोयल गार्डनच्या उत्तरेकडील रस्त्यास जेथे मिळते ( स.नं. ६२० बिबवेवाडी, अमोल सोसायटी प्लॉट नं. बी २ च्या दक्षिणेकडील रस्ता ) तेथून पश्चिमेस गोयल गार्डनच्या उत्तरेकडील रस्त्याने गंगाधाम शत्रुंजय रस्ता ओलांडून पुढे आई माता मंदिराच्या उत्तरेकडील रस्त्याने आईमाता मंदीराच्या पश्चिमेकडील रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस आईमाता मंदीराच्या पश्चिमेकडील रस्त्याने स.नं ६५० बिबवेवाडी जागडेनगर मधील पुर्व-पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस शिवतीर्थ इमारतीच्या पूर्वेकडील रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर रस्त्याने बिबवेवाडी जागडेनगर मधील पुर्व- पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस अप्पर इंदिरानगर चाळ क्र. बी १०३ च्या (पीएमटी कॉलनीच्या) पूर्वेकडील हद्दीस मिळेपर्यंत, तेथून दक्षिणेस सदर हद्दीने अप्पर इंदिरानगर मधील VIT कॉलेज जवळ बालाजी सुपर मार्केटच्या दक्षिणेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस बालाजी सुपर मार्केटच्या दक्षिणेकडील हद्दीने VIT कॉलेजच्या पूर्वेकडील रस्त्यास (जानकी पथास) मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस व पुढे पश्चिमेस जानकी पथाने अप्पर इंदिरानगर चाळीच्या उत्तरेकडील हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने स्वामी विवेकानंद रस्त्यास मिळेपर्यंत, तेथून उत्तरेस स्वामी विवेकानंद रस्त्याने लोअर इंदीरानगर दक्षिणेकडील हद्दीस / भिंतीस (हस्तीपूरम सोसायटीची उत्तरेकडील हद्द) मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस लोअर इंदिरानगरच्या दक्षिणेकडील हद्दीने/भिंतीने अंबील ओढयास मिळेपर्यंत तेथून उत्तरेस अंबील ओढयाने काशिनाथ पाटील नगर, धनकवडी मधील गंगोत्री इमारतीच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम हद्दीस मिळेपर्यंत तेथून पश्चिमेस सदर हद्दीने न्यू गुलशन अपार्टमेंटच्या पूर्वेकडील गल्लीस मिळेपर्यंत तेथून दक्षिणेस शीतल अपार्टमेंटच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्त्यास मिळेपर्यंत. तेथून पश्चिमेस सदर रस्त्याने पुणे सातारा रस्त्यास मिळेपर्यंत.

पश्चिमः काशिनाथ पाटील नगर, धनकवडी मधील शीतल अपार्टमेंट इमारतीच्या दक्षिणेकडील पूर्व पश्चिम रस्ता पुणे सातारा रस्त्यास जेथे मिळतो, तेथून उत्तरेस पुणे सातारा रस्याने के के मार्केट चौक ओलांडून शिवनेरी रस्त्यास मिळेपर्यंत.

 

The Karbhari - PMC Election 2025

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: