PMC Budget 2026-27 | पुणेकरांनो आपल्या प्रभागातील कामे महापालिकेच्या बजेट मध्ये सुचवा | १ सप्टेंबर आहे कालावधी 

Homeadministrative

PMC Budget 2026-27 | पुणेकरांनो आपल्या प्रभागातील कामे महापालिकेच्या बजेट मध्ये सुचवा | १ सप्टेंबर आहे कालावधी 

Ganesh Kumar Mule Aug 01, 2025 1:37 PM

Pandharpur Ashadhi Wari 2023 | पंढरपूर आषाढी यात्रेसाठी ५००० विशेष बसेस सोडणार | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Pune Municipal Corporation Fort Competition | पुणे महापालिकेची किल्ले स्पर्धा आजपासून | सर्वोत्कृष्ट किल्ल्यास ७००१ चे बक्षीस 
PMC Property tax Abhay Yojana | अभय योजनेचे उरले अवघे ३ दिवस | सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन |आतापर्यंत मिळाले ५७४ कोटी 

PMC Budget 2026-27 | पुणेकरांनो आपल्या प्रभागातील कामे महापालिकेच्या बजेट मध्ये सुचवा | १ सप्टेंबर आहे कालावधी

 

Pune PMC Budget – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेच्या सन २०२६-२०२७ चे अंदाजपत्रक तयार करण्याचे कामकाज सुरू करण्यात आलेले आहे. त्यानुसार विविध विभागांचे अंदाजपत्रकीय कामकाज करण्यास सुरुवात झालेली आहे. नागरिकांनी आपल्या परिसरातील महत्त्वाच्या कामांचा अंदाजपत्रकामध्ये समावेश करणेसाठी त्यांच्या प्रभागातील कामे सुचविणेबाबत महापालिका प्रशासनाकडून जाहीर प्रकटन प्रसिद्ध  करण्यात आले  आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

यासाठी आवश्यक असणाऱ्या नमुन्यातील अर्ज प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडे आजपासून ते १ सप्टेंबर पर्यंत कार्यालयीन कामाचे दिवशी व वेळी विनामूल्य वाटपाकरिता उपलब्ध आहेत. तसेच नागरिकांसाठी Online पद्धतीने अर्ज भरण्यासाठी https://pbpune.pmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. सदरचे अर्ज स्वीकारण्याची अंतिम मुदत दि. ०१/०९/२०२५ रोजी सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत आहे. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: