PMP Travel Without Ticket | ‘पीएमपीएमएल’कडून  मे व जून  या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून १२ लाख ८९ हजार दंड वसुली!

Homeadministrative

PMP Travel Without Ticket | ‘पीएमपीएमएल’कडून  मे व जून  या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून १२ लाख ८९ हजार दंड वसुली!

Ganesh Kumar Mule Jul 11, 2025 9:07 PM

Rotating washing’ centre | पीएमपीएमएलच्या फिटरने बनविले ‘फिरते वॉशिंग’ सेंटर
PMPML Pune | Need to get new buses in PMPL’s fleet! – Former MLA Mohan Joshi
PMPML Pune | वाहतुकीच्या नियमांचे पालन न करणाऱ्या PMPML च्या चालक – वाहक सेवकांवर होणार कारवाई

PMP Travel Without Ticket | ‘पीएमपीएमएल’कडून  मे व जून  या कालावधीत विनातिकीट प्रवाशांकडून १२ लाख ८९ हजार दंड वसुली!

| गैरवर्तन करणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून ८ लाख ४४ हजार ६८  दंडवसुली

 

PMPML Pune – (The Karbhari News Service) – ‘पीएमपीएमएल’ने प्रवाशांचा व कर्मचारी वर्गाचा शिस्तबद्ध व सुरक्षित प्रवास सुनिश्चित करण्यासाठी  मे २०२५ ते जून २०२५ या कालावधीत बसेस तपासणी दरम्यान विनातिकीट प्रवाशांकडून १२ लाख ८९ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. (PMP Bus Pune)

‘पीएमपीएमएल’ बस मधून विनातिकीट प्रवास करणाऱ्या प्रवासी यांना ‘पीएमपीएमएल’ कडून प्रती प्रवासी रक्कम रुपये ५००/- दंड आकारण्यात येतो. त्यानुसार २५७८ प्रवाशांकडून १२ लाख ८९ हजार रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. तसेच परिवहन महामंडळाकडे कार्यरत चालक व वाहक यांनी केलेल्या गैरवर्तना बाबत तिकीट तपासणीस यांचेकडून रिपोर्ट परिवहन महामंडळाकडे सादर केले जातात. त्यानुषंगाने झालेल्या गैरवर्तनानुसार दंड आकारण्यात येतो. त्यानुसार माहे मे २०२५ ते जून २०२५ या कालावधीत कर्मचाऱ्यांकडून ८ लाख ४४ हजार ६८ रु. दंड वसूल करण्यात आला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: