Pune PMC Schools | पुणे महानगरपालिकेच्या शाळेत पहिल्या दिवशी  लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकारी देणार शाळांना  भेट

Homeadministrative

Pune PMC Schools | पुणे महानगरपालिकेच्या शाळेत पहिल्या दिवशी  लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकारी देणार शाळांना  भेट

Ganesh Kumar Mule Jun 13, 2025 7:39 PM

PMC Employees DA Hike | केंद्राच्या धर्तीवर महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित महागाई भत्ता लागू करा | मार्च पेड इन एप्रिल च्या वेतनात अदा करण्याची मागणी 
Shivajinagar Bus Station | शिवाजीनगर येथे आधुनिक सोयींनी युक्त बसस्थानक उभारावे; राज्य मार्ग परिवहन महामंडळासोबत ‘महामेट्रो’ने समन्वयाने काम करावे
Swarget Rape Case | स्वारगेट बस डेपो घटना : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आंदोलन 

Pune PMC Schools | पुणे महानगरपालिकेच्या शाळेत पहिल्या दिवशी  लोकप्रतिनिधी आणि विविध अधिकारी देणार शाळांना  भेट

Pune PMC News – (The Karbhari News Service) –  25 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाने “ १०० शाळांना भेटी देणे” या उपक्रमांतर्गत  मंत्री,  राज्य मंत्री आणि लोकप्रतिनिधी, वर्ग १ व वर्ग २ चे सर्व अधिकारी शाळेच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी शाळांना भेटी देतील असे सूचित केले आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

शासनाच्या निर्णयानुसार पुणे महानगरपालिकेच्या ३१८ शाळांना सर्व लोकप्रतिनिधी, पुणे महानगरपालिकेचे महापालिका आयुक्त, अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सर्व खाते प्रमुख, महानगरपालिकेच्या सर्व खात्यांचे अधिकारी तसेच शिक्षण विभागाचे सर्व अधिकारी यांच्या भेटीचे नियोजन केले आहे. सर्व लोकप्रतिनिधी आणि अधिकारी पहिल्या दिवशी म्हणजेच १६ जून  रोजी सकाळ सत्रातील शाळांना सकाळच्या वेळेत आणि दुपार सत्रातील शाळांना दुपारच्या वेळेत भेटी देतील. शाळांमध्ये शालेय वर्षाची सुरूवात उत्साहात आणि आनंदात करण्याच्या प्रमुख उद्देशाने ही भेट असेल. शाळेच्या पहिल्याच दिवशी सर्व विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके उपलब्ध झालेली आहेत याचीही खातरजमा करतील. अशी माहिती महापालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

भेटीचा उद्देश: शाळेच्या पहिल्या दिवसांपासून मुलांची उपस्थिती वाढविणे तसेच शाळेची गुणवत्ता वृद्धिंगत करण्यासाठी समाज आणि पालकांचा सकारात्मक दृष्टिकोन करणे, नवीन शिक्षणिक वर्षा सुरवात उत्साही वातावरणात आनंददायी हा शाळाभेटीचा प्रमुख उद्देश आहे. शाळेचा पहिला दिवस उत्सव म्हणून साजरा करणे, शाळेत आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करणे, आणि शाळेतील भौतिक सुविधांचा आढावा घेणे, विद्यार्थ्यांना उत्तम दर्जाच्या भौतिक सुविधा देण्यासाठी काय करता येईल याबाबत मुख्याध्यापक, शिक्षक,पालक, शाळा व्यवस्थापन समिती यांचे सोबत चर्चा करणे याबरोबरच शाळेतील क्रीडा सुविधांची उपलब्धता आणि वापराचे मार्गदर्शन करणे, तसेच शालेय कामकाज आणि शाळेच्या गुणवत्तेचा आढावा घेणे यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल. शाळेच्या विकासासाठी आवश्यक सुधारणा आणि उपाययोजना सुचविल्या जातील, तसेच धोकादायक इमारती व वापरात नसलेली स्वच्छतागृहे अशा अडचणी आढळून आल्यास संबंधित यंत्रणेच्या निदर्शनास आणून त्या दूर करण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील.

एकूणच लोक प्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची शाळा भेट ही विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, शिक्षक यासर्व घटकांसाठी प्रेरणादायी आणि शैक्षणिक वर्षांच्या सुरवातीला ऊर्जा देणारी ठरेल अशी अपेक्षा आहे.  असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.