Pune Municipal Corporation – (PMC) – दोन महानगरपालिका होणे काळाची गरज | काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Homeadministrative

Pune Municipal Corporation – (PMC) – दोन महानगरपालिका होणे काळाची गरज | काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

Ganesh Kumar Mule May 26, 2025 8:31 PM

Pune PMC News | नगरसचिव आणि क्रीडा अधिकारी पदावर नेमणुकी बाबतचे महापालिका आयुक्त यांचे आदेश जारी 
8th Pay Commission | 8वा वेतन आयोग: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी सरकारकडूनच आला हा संदेश! |   कोणता सिग्नल मिळाला ते जाणून घ्या
Navale Bridge Accident | नवले पुलावर अपघात | तीन वाहनांनी घेतला पेट | आतापर्यंत ७ लोकांचा मृत्यू

Pune Municipal Corporation – (PMC) – दोन महानगरपालिका होणे काळाची गरज | काँग्रेसची मुख्यमंत्र्यांकडे मागणी!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका चे विघटन करून दोन महापालिका कराव्यात आणि पुणेकरांचा त्रास कमी करावा. अशी मागणी प्रदेश काँग्रेस चे सरचिटणीस आणि माजी नगरसेवक संजय बालगुडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. (Sanjay Balgude Congress)

पुणे महानगरपालिकेची हद्द समाविष्ट 32 गावांच्या मुळे साडेचारशे स्क्वेअर किलोमीटरच्या आसपास झाली आहे. त्यामुळे शहरातील पुणेकर व ग्रामीण भागातील पुणेकरांना योग्य त्या सुविधा मिळत नाहीत . मुंबईचे विघटन होऊन सहा महानगरपालिका झाल्यात परंतु पुण्याच्या किमान दोन महानगरपालिका होणे काळाची गरज आहे. असे संजय बालगुडे यांनी म्हटले आहे. (Pune News)

बालगुडे यांनी पुढे म्हटले आहे की, सध्या सर्वच बाबतीत पुणे शहरावर ताण आला आहे. पाणी, वाहतूक कोंडी स्वच्छता, आरोग्य, विद्युत, शहराची लोकसंख्या सुद्धा ४० लाखाच्या वर गेलेली आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पुणेकरांना द्यावी लागणारी घरपट्टी ही पुणे मनपा ही सर्वात जास्त कर आकारणी करणारी महानगरपालिका आहे. एक प्रकारे प्रामाणिकपणे कर भरणाऱ्या नागरिकांच्या छळ चालू झाला आहे. केवळ कर भरायचा व सुविधा नाहीत अशी अवस्था पुण्याची झाली आहे.

यापूर्वी अनेक नेत्यांनी पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून नवीन महानगरपालिका करण्याच्या घोषणा केल्या आहेत. अर्थात तसा निर्णय झालेला नाही. तरी आपण पुणे महानगरपालिकेचे विभाजन करून नव्याने महानगरपालिका करावी व पुणेकरांचे हाल थांबवावे. अशी मागणी बालगुडे यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे केली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: