PMPML Ticket Price Hike | पीएमपीएल मधील भाडे दरवाढीत सवलत देऊन जनतेस दिलासा द्यावा | राणी भोसले यांनी पीएमपीच्या सीएमडी कडे मागणी 

Homeadministrative

PMPML Ticket Price Hike | पीएमपीएल मधील भाडे दरवाढीत सवलत देऊन जनतेस दिलासा द्यावा | राणी भोसले यांनी पीएमपीच्या सीएमडी कडे मागणी 

Ganesh Kumar Mule May 23, 2025 7:35 PM

Pune Timber Market Fire | टिंबर मार्केट येथील दुकाने स्थलांतरित करण्याबाबत विचार | महापालिका आयुक्तासोबत लवकरच बैठक 
Sinhgadh City School Kondhwa | सिंहगड सिटी स्कूल, कोंढवा या शाळेवरील कार्यवाहीसाठी शिक्षण उपसंचालकांकडे प्रस्ताव – नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ
Let’s Talk | संभाजी उद्यान येथे ‘चला बोलूया’ फलकाचे उद्घाटन

PMPML Ticket Price Hike | पीएमपीएल मधील भाडे दरवाढीत सवलत देऊन जनतेस दिलासा द्यावा | राणी भोसले यांनी पीएमपीच्या सीएमडी कडे मागणी

 

Pune PMP – (The Karbhari News Service) – पीएमपीएल (PMPML) मधील भाडे दरवाढीत सवलत देऊन जनतेस दिलासा द्यावा. अशी मागणी माजी नगरसेविका  राणी भोसले (Rani Bhosale BJP) यांनी पीएमपीच्या सीएमडी दीपा मुधोळ मुंडे (Deepa Mudhol Munde IAS) यांच्या  कडे केली आहे. (Pune News)

राणी भोसले यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका हद्दीतील अनेक नागरिक हे सार्वजनिक वाहतुकी करतात. बसचा प्रवास करत असतात यामध्ये अनेक त्रुटी असून देखील सामान्य जनता आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये पीएमपीएल मधून प्रवास करून सार्वजनिक वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून अनेकजण पीएमपीएल ने प्रवास करतात. परंतु आता नव्याने बस प्रवासामध्ये अचानक दुपटीने भाडेवाढ केलेली आहे. अनेक जनता मंच, सामाजिक संस्था, अनेक नागरिक यासाठी आपण ही दरवाढ कमी करावी म्हणून प्रयत्न करीत आहेत. एक  लोकप्रतिनिधी म्हणून माझी मागणी आहे की आपण त्वरित ही दरवाढ कमी करून सामान्य जनतेस दिलासा द्यावा. असे भोसले यांनी म्हटले आहे.

भोसले यांनी पुढे म्हटले आहे कि, तसेच माझ्या प्रभागातील लेक टाऊन परिसरातील पुणे स्टेशन व शिवाजीनगर स्टेशन या बस ज्या तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आल्या होत्या त्या देखील चालू करण्यात याव्या.  महाराष्ट्र शासनामध्ये एसटी प्रवासामध्ये ज्याप्रमाणे महिलांना सवलत मिळते तशी सवलत पुणे शहरात देखील महिलांना मिळावी यासंदर्भात  चर्चा केली खूपच सकारात्मक पद्धतीने सीएमडी यांनी माझे म्हणणे ऐकून घेतले. अतिशय पॉझिटिव्ह असणाऱ्या सीएमडी निश्चितच याबद्दल विचार करतील. असा विश्वास भोसले यांनी व्यक्त केला.