Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थिएटर या उड्डाणपूलाचे उद्या उद्घाटन

Homeadministrative

Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थिएटर या उड्डाणपूलाचे उद्या उद्घाटन

Ganesh Kumar Mule Apr 30, 2025 9:00 PM

National Voter Day | पक्षपाती निवडणूक आयोगामुळे मतदार राजावर अन्याय – माजी आमदार मोहन जोशी यांची टीका
Work on Saturday, Sunday | बोनस वेळेत अदा करण्यासाठी ऑडिटर सेवकांना शनिवार, रविवारी कामावर येण्याचे आदेश  | 18 ऑक्टोबर पर्यंत बिले तपासणीच्या वित्त व लेखा अधिकारी उल्का कळसकर यांच्या सूचना 
Chhatrapati Sambhaji Maharaj National Award | मनीषा पाटील यांना छत्रपती संभाजी महाराज राष्ट्रीय पुरस्कार

Sinhgadh Road Flyover | सिंहगड रस्त्यावरील राजाराम पूल ते फनटाईम थिएटर या उड्डाणपूलाचे उद्या उद्घाटन

 

Pune News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिकेतर्फे शहरात वाहतुक सुरळीत व्हावी याकरिता नवीन रस्ते, उड्डाणपूल विकसित करण्यात येत आहेत. शहरांतर्गत दळणवळणासाठी रस्त्यांची आणि उड्डाणपूलांची आवश्यकता लक्षात घेवून यासंदर्भात नवनवीन प्रकल्प सुरु करण्यात येत आहेत. यांचाच एक भाग म्हणून सिंहगड रस्त्यावर राजाराम पूल ने फनटाईम थिएटरपर्यंत नव्याने उड्डाणपूल विकसित करण्यात आलेला आहे.  (Pune News)

या उड्डाणपूलाचे उद्घाटन अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री, पुणे जिल्हा यांच्या शुभहस्ते आणि मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार, नागरी विमान वाहतूक, भारत सरकार यांच्या अध्यक्षतेखाली,  चंद्रकांत (दादा) पाटील, मंत्री, उच्च आणि तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग, आणि संसदीय कार्ये, महाराष्ट्र राज्य व मा. डॉ. नीलम गोऱ्हे, उपसभापती, विधान परिषद, महाराष्ट्र राज्य आणि मा. माधुरी मिसाळ, मंत्री, शहरी विकास, वाहतूक, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण, अल्पसंख्याक विकास व औकाफ, महाराष्ट्र राज्य यांच्या प्रमुख उपस्थितीत गुरुवार,  १ मे २०२५ रोजी, सकाळी ०७.०० (सात) वाजता, राजाराम पूल चौक, सिंहगड गेड, पुणे येथे आयोजित करण्यात आले आहे.

सिंहगड रस्त्यावरील विठ्ठलवाडी कमान ते फनटाइम थिएटरपर्यंत बांधण्यात आलेल्या २१२० मी लांबीच्या पुलाचे उद्घाटन (टप्पा क्र. २)

> निविदा रक्कम- ११८.३७ कोटी.

> टप्पा क्र. १ – राजाराम पुलाजवळील स्वारगेट कडे जाणारा ५२० मी लांब एकेरी उड्डाणपूल – ऑगस्ट २०२४ मध्ये वाहतुकीसाठी खुला
टप्पा क्र. २ – विठ्ठलवाडी ते फन टाईम थिएटर पर्यंतचा सिंहगड कडे जाणारा २.२ कि. मी. लांब उड्डाणपूल- लोकार्पण सोहळा (दिनांक १ मे, २०२५).
> टप्पा क्र. ३- इंडिअन ह्यूम गेट (गोयल गंगा चौक) ते इनामदार चौक पर्यंतच्या स्वारगेट कडे जाणाऱ्या १.५ कि. मी. लांबीच्या उड्डाणपूलाचे काम सद्यस्थितीत ९०% पूर्ण झाले असून १५ जून, २०२५ पर्यंत काम पूर्ण करण्यात येणार आहे.

उड्डाणपुलाची लांबी – २.२ कि.मी.
उड्डाणपुलाच्या रस्त्याची रुंदी – ७.३ मी.
> एकूण पिलर सुपरस्ट्रक्चर – ६० प्रिस्ट्रेस बॉक्स गर्डर

उड्डाणपुलामुळे होणारे फायदे

> सिंहगड रस्ता हा एकमेव रस्ता ह्या भागासाठी असल्याने व लगतच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिकीकरण झाल्याने सदर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूकीचा ताण येत आहे.
> सदर उड्डाणपूलामुळे इनामदार चौक, हिंगणे चौक, संतोष हॉल चौक, ब्रह्मा हॉटेल चौक व गोयल गंगा चौक असे पाच चौक ओलांडून थेट वाहतूक करणे शक्य होणार आहे.
> उड्डाणपुलामुळे सुमारे ३० मिनिटे वेळ वाचून दररोज सुमारे दीड लक्ष वाहनांची वाहतुकीची वर्दळ सुलभ होणार आहे > वाहतुकीची कोंडी सुटल्यामुळे इंधन आणि वेळेची बचत होऊन प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे.
→ उड्डाणपुलामुळे खडकवासला, नन्हे, वडगाव, धायरी, नांदेड गाव तसेच राष्ट्रीय महामार्ग बायपास व सिंहगड कडे जाणे सोयीस्कर होणार आहे.
→ पादचाऱ्यांना जमीन स्तरावर सुरक्षितपणे रस्ता ओलांडणे सोयीचे होणार आहे.