Bharatratna | क्रांतीसूर्य महात्मा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ‘भारतरत्न’ देण्याच्या शिफारशीचा ठराव विधानसभेत एकमताने मंजूर
| लोकमान्यतेसह राजमान्यतेसाठीचा ऐतिहासिक ठराव – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Mahatma Phule – (The Karbhari News Service) – क्रांतीसूर्य महात्मा जोतिराव फुले (Mahatma Jyotiba Phule) आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांना केंद्र सरकारने देशाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ (Bharatratna) प्रदान करावा, या शिफारशीचा ठराव आज महाराष्ट्र विधानसभेने (Maharashtra Vidhansabha) मंजूर केला. हा ऐतिहासिक ठराव महाराष्ट्र विधानसभेने एकमताने मंजूर केल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) यांनी समाधान व्यक्त केले. (Pune News)
या ठरावाबाबत विधानसभेत निवेदन करताना मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, “ कुठल्याही देशात दोन प्रकारच्या मान्यता असतात – एक राजमान्यता आणि दुसरी लोकमान्यता. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले हे लोकमान्यतेचे प्रतीक आहेत. त्यांची लोकमान्यता कधीच हिरावून घेता येणार नाही. मात्र, त्याच वेळी भारतरत्न हा राजमान्यता मिळवून देणारा सर्वोच्च सन्मान आहे आणि या महान विभूतींना तो सन्मान मिळायला हवा.”
या ठरावामुळे सामाजिक सुधारणांचा पाया रचणाऱ्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला सर्वोच्च मान्यता मिळणार आहे. हा निर्णय महाराष्ट्राच्या प्रगतीशील आणि समतावादी भूमिकेला अधोरेखित करणारा आहे. ‘भारतरत्न’ पुरस्काराच्या माध्यमातून या विभूतींचे कार्य राष्ट्रीय स्तरावर अधोरेखित होणार असून, संपूर्ण देशासाठी हा अभिमानाचा क्षण असेल, असेही मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी नमूद केले.

COMMENTS