Pune Metro Station Agitation | मेट्रो स्टेशनवर आंदोलन | पक्षाकडून हकालपट्टी

Homeadministrative

Pune Metro Station Agitation | मेट्रो स्टेशनवर आंदोलन | पक्षाकडून हकालपट्टी

Ganesh Kumar Mule Mar 09, 2025 4:35 PM

Chhatrapati Shivaji Maharaj | राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष आक्रमक : छत्रपती शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक
NCP -SCP on Inflation | पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने एल्गार आंदोलन
Pune News | पुणे शहरात ढासळलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या विरोधात तीव्र निषेध आंदोलन

Metro Station Agitation | मेट्रो स्टेशनवर आंदोलन | पक्षाकडून हकालपट्टी

 

Pune News – (The Karbhari News Service) – आज दुपारी मनपा भवन येथील मेट्रो स्टेशनवर नरेंद्र पावटेकर नामक एका युवकाने शिक्षण, रोजगार, भ्रष्टाचार अशा विविध मुद्द्यांवर किनारयावर थांबत आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. हे करीत असताना सुरक्षिततेच्या दृष्टीने अग्निशमन दलाची तीन वाहने दाखल झाली होती. सद्यस्थितीत सर्व आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

नरेंद्र पावटेकर यांची पक्षातून हकलपट्टी – प्रशांत जगताप

नरेंद्र पावटेकर हे कसबा विधानसभा मतदारसंघातील कार्यकर्ते आहेत, त्यांनी मागील तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केलेला होता. प्रवेश घेतल्यानंतर त्यांनी पक्षाच्या कुठल्याच आंदोलनात व कार्यक्रमात सहभाग घेतलेला नाही. अशा परिस्थितीमध्ये आज त्यांनी पुणे मेट्रोच्या विरोधामध्ये आंदोलन केले आणि आंदोलन केल्यानंतर पोलिसांशी हुज्जत घालणे त्याचबरोबर एकूणच पुणेकरांची अडवणूक करणे या गोष्टी केल्या.निश्चितच या सर्व गोष्टी निषेधार्य आहेत. आजचे त्यांचे आंदोलन ही वैयक्तिक असून त्याचा पक्षाशी काही संबंध नाही, आणि एकूणच पुणेकरांची आडवणूक करणे आणि पोलीस अधिकाऱ्यांबरोबर हुज्जत घालणे या सर्व प्रकाराबाबत पक्षाचा काहीही संबंध नाही. त्यांच्या या सर्व गोष्टी विचारात घेता त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. अशी माहिती पक्षाचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.