Dr Rajendra Bhosale IAS | विकास कामांवर झालेल्या खर्चाची माहिती लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लावण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

HomeUncategorized

Dr Rajendra Bhosale IAS | विकास कामांवर झालेल्या खर्चाची माहिती लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लावण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

Ganesh Kumar Mule Feb 14, 2025 9:15 PM

PMC Special School Students | पुणे महापालिकेच्या विशेष शाळेतील मुलांनी बनविलेल्या  वस्तूंचे प्रदर्शन आणि विक्री या उपक्रमाचा शुभारंभ
PMC Pune Book Festival | पुणे पुस्तक महोत्सवाअंतर्गत उद्या दुपारी १२ ते १ या वेळेत ‘शांतता…पुणेकर वाचत आहेत’ उपक्रमाचे आयोजन | महापालिका कर्मचाऱ्यांना देखील आयुक्तांचे आदेश 
PMC Deputy Commissioner | पुणे महापालिकेच्या उपायुक्तांना रात्रीची ड्युटी 31 ऑगस्ट पर्यंत करावी लागणार | महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले यांचे आदेश

Dr Rajendra Bhosale IAS | विकास कामांवर झालेल्या खर्चाची माहिती लोकप्रतिनिधी आणि नागरिकांना क्षेत्रीय कार्यालय स्तरावर लावण्याचे महापालिका आयुक्तांचे आदेश

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – सर्वसामान्य जनतेला तसेच लोक प्रतिनिधींना त्या-त्या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या विकास कामांवर झालेल्या खर्चाची माहिती सर्व क्षेत्रीय कार्यालये स्तरावर दर्शनी भागात लावण्यात यावी. असे आदेश महापालिका आयुक्त डॉ राजेंद्र भोसले (Dr Rajendra Bhosale IAS) यांनी यांनी प्रशासनाला दिले आहेत. (Pune Municipal Corporation – PMC)

पुणे महानगरपालिकेच्या विविध विभागांमार्फत तसेच क्षेत्रीय कार्यालयांमार्फत त्या-त्या आर्थिक वर्षातील अंदाजपत्रकात नमूद केलेल्या, तसेच करण्यात येणाऱ्या कामांवर झालेल्या खर्चाच्या अनुषंगाने नागरिक तसेच लोक प्रतिनिधी यांचेकडून माहिती मिळणेबाबत महापालिका आयुक्त तसेच अतिरिक्त महापालिका आयुक्त यांचेकडे वारंवार पत्रव्यवहार करणेत येत आहे. ही बाब लक्षात घेता, सर्वसामान्य जनतेला तसेच लोक प्रतिनिधींना त्या-त्या आर्थिक वर्षात करण्यात आलेल्या विकास कामांवर झालेल्या खर्चाची माहिती प्राप्त होणेच्या अनुषंगाने सर्व क्षेत्रीय कार्यालये तसेच प्रभागात करण्यात येणाऱ्या विकास कामांच्या अनुषंगाने केलेल्या खर्चाच्या तपशीलाच्या माहितीचा तक्ता / फलक कार्यक्षेत्रात दर्शनी भागात लावण्यात यावा. असे आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.

ही माहिती द्यावी लागणार

आर्थिक वर्ष
कामाची गरज
कामासाठी अंदाजपत्रकीय तरतूद
निविदा प्रक्रिया
कार्यादेश
ठेकेदाराचे नाव
कामाची प्रगती
काम पूर्ण होण्याचा दिनांक
प्रत्यक्ष काम पूर्ण झाल्याचा दिनांक
संबंधित कामकाज हातळणाऱ्या अधिकारी/ कर्मचारी यांचे नाव

तसेच नागरिकांनी / लोक प्रतिनिधींनी तक्त्यात नमूद केलेल्या माहितीची अद्ययावत प्रत (हार्ड कॉपी ) मिळणेची मागणी केल्यास संबंधित अधिकारी / कर्मचारी यांनी ती त्वरित उपलब्ध करून देणेची दक्षता घ्यावी. असेही आयुक्तांनी आपल्या आदेशात म्हटले आहे.