Parvati Assembly Constituency | ‘पर्वती’चा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करणार: आबा बागुल
Aba Bagul Parvati – (The Karbhari News Service) – पर्वती विधानसभा मतदारसंघाचा १५ वर्षात खुंटलेला विकास ५ वर्षात पूर्ण करण्याची ग्वाही अपक्ष उमेदवार आबा बागुल यांनी दिली.
आबा बागुल यांच्या प्रचाराला सर्वच स्तरातून मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रचाराच्या विविध टप्प्यात मतदारांनी मतदारसंघातील १५ वर्षांपासून भेडसावत असलेल्या समस्यांची कैफियत आबा बागुल यांच्यासमोर मांडली. विविध समस्यांच्या गर्तेतून सुटका कधी अशी व्यथा मांडताना पाणी, आरोग्य, शिक्षण, रोजगार, वाहतूक कोंडी, कचरा,महिला सुरक्षितता आदींसह सर्वच प्रश्न जटील बनले आहेत.आता आमचे जगणे सुसह्य करायचे आहे. भावी पिढीचे जीवनमान उंचवायचे आहे. त्यामुळे आता आम्ही परिवर्तन करणार असा निर्धारही मतदारांनी व्यक्त केला आहे.
त्यावर आबा बागुल यांनी विकासाचा अनुशेष भरून काढताना राज्य शासनाच्या पातळीवर दर्जेदार शिक्षण, निरामय आरोग्य, सुरक्षितता, कोंडीमुक्त वाहतूक, कचऱ्याचे निवारण, तरुणांना रोजगार, मुबलक आणि समान पाणीपुरवठा यासह सर्वच प्रश्नांवर मी धोरणात्मक निर्णय करून घेण्यासाठी वचनबद्ध आहे. त्यासाठी मला एकदा संधी द्या, त्याचे सोने केल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही.त्यासाठी बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी हिरा निशाणीसमोरील बटन दाबून विक्रमी मतांनी निवडून देण्याचे आवाहन केले.
पर्वती मतदारसंघाच्या शाश्वत विकासाचा आराखडा तयार आहे. राज्यपातळीवर त्यासाठी धोरणात्मक निर्णय करून घेऊन पर्वती मतदारसंघाला विकासाच्या बाबतीत समृद्ध केले जाईल. आजवर नगरसेवक पदाच्या माध्यमातून विविध आदर्शवत प्रकल्पांची उभारणी केली आहे. त्यामुळे ती दृष्टी माझ्याकडे आहे. जनहितासाठीच मी सदैव कटिबद्ध आहे. त्यासाठी जनतेचा उमेदवार म्हणून मला हिरा निशाणीसमोरील बटन दाबून विक्रमी मतांनी देणे आवश्यक आहे. असेही आबा बागुल म्हणाले.
COMMENTS