DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याची मागणी! 

Homeadministrative

DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याची मागणी! 

Ganesh Kumar Mule Oct 22, 2024 8:43 PM

PMPML | 7th pay Commission | पीएमपी कर्मचारी वेतन आयोग | दोन्ही महापालिका आणि पीएमपी प्रशासनाचे एकमेकांकडे बोट 
DA Hike Update | 7th Pay Commission | राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात चार टक्के वाढ
7th Pay Commission DA Hike | महागाई भत्ता शून्य (0) कि 54% असेल?  केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन अपडेट |  यामुळे तणाव वाढला 

DA Hike | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना सुधारित दराने महागाई भत्ता देण्याची मागणी!

 

Pune PMC News – (The Karbhari News Service) – पुणे महानगरपालिका कर्मचा-यांना (PMC Employees) १ जुलै २०२४ पासून सुधारित दराने महागाई भत्ता (Dearness Allowance) देण्याची मागणी करण्यात आली आहे. पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेच्या वतीने महापालिका आयुक्त यांच्याकडे ही मागणी केली आहे. (Pune Municipal Corporation – PMC)

केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालय विभागाकडील ज्ञापन अन्वये केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचा-यांना १ जुलै २०२४ पासून ५० टक्के वरून ५३ टक्के प्रमाणे महागाई भत्ता वाढ मंजूर केलेली आहे. पुणे महानगरपालिका अधिकारी/ सेवकांना १ नोव्हेंबर १९७७ पासून केंद्र शासनाच्या सेवकांप्रमाणे महागाई भत्ता देणेस तसेच त्या मध्ये होणारे बदल जसेच्या तसे लागू करणेस  मनपा सभे ने धोरणात्मक मान्यता दिली आहे. (Pune PMC News)

पुणे महानगरपालिकेतील अधिकारी/ सेवकांना व सेवानिवृत्त अधिकारी / कर्मचारी सेवकांना कुटुंबनिवृत्ती वेतनधारक यांना दिनांक ०१ जून २०२४ पासून ५०
टक्के वरून ३ टक्के दराने महागाई भत्ता वाढवुन ५३ टक्के दराने महागाई भत्ता फरकासह माहे ऑक्टोबर २०२४ पेड इन नोव्हेंबर २०२४ वेतनामध्ये अदा करण्यात यावे. असे संघटनाच्या वतीने सांगण्यात आले आहे.

—-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0