Oxygen Park Pune | पुण्यातील पहिल्या ऑक्सीजन पार्कचे शुक्रवारी होणार लोर्कापण | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Homeadministrative

Oxygen Park Pune | पुण्यातील पहिल्या ऑक्सीजन पार्कचे शुक्रवारी होणार लोर्कापण | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

Ganesh Kumar Mule Oct 03, 2024 7:14 PM

Social Awareness of DCM Ajit Pawar : भाषण थांबवून अजित पवारांनी जपली सामाजिक बांधिलकी 
Pune News | पुण्याचे पालकमंत्री अजितदादा की मोहोळ? |माजी आमदार मोहन जोशी यांनी उपस्थित केला सवाल 
Mumbai Samachar | मराठी – गुजराती हे नाते अधिक दृढ व्हावे | मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Oxygen Park Pune | पुण्यातील पहिल्या ऑक्सीजन पार्कचे शुक्रवारी होणार लोर्कापण | आमदार सुनिल टिंगरे यांची माहिती

 

MLA Sunil Tingre – (The Karbhari News Service) – पुण्यातील पहिल्या राजमाता जिजाऊ ऑकसीजन पार्कच्या उद्घाटनासह वडगाव शेरी मतदारसंघातील विविध विकासकामांचे भुमिपुजन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज शुक्रवारी होणार आहे. वडगाव शेरीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनिल टिंगरे यांनी ही माहिती दिली. (Pune News)

कोरोना काळात ऑक्सीजन पुरवठ्याच्या प्रश्न गंभीर बनला. या महामारीतून धडा घेत आमदार सुनिल टिंगरे यांच्या संकल्पनेतून खराडी येथे साडेसात एकर जागेत 25 हजार देशी वृक्षांची लागवड केलेले ऑक्सीजन पार्क साकारण्यात आले आहे. या उद्यानात राजामाता जिजाऊ व बाल शिवाजी यांचे शिल्प बसविण्यात येणार आहे. याशिवाय साडेसातशे मीटरचा वॉकिग ट्रॅक़, ओपन थिएटर, नासा फ्लॉवर गार्डन, लहान मुलांसाठी मेझ गार्डन, अ‍ॅक्युप्रेशर ट्रॅक़ अशा विविध सुविधा असणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सायंकाळी पाच वाजता या पार्कचे उद्घाटन होणार आहे.

त्याचबरोबर येरवडा येथील भाजी मंडई इमारतीचे भुमिपुजन व नगर रस्त्यावरील येरवडा शास्त्रीनगर चौकातील भुयारी मार्ग व उड्डाणपूल प्रकल्पाचे भुमिपुजनही उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमानंतर पुणे महापालिका आणि विजय मंग़ल प्रतिष्ठाण यांच्यावतीने आयोजित शिवथडी जत्रचे उद्घाटन पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आमदार सुनिल टिंगरे यांनी दिली.
——————————-

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0