PMC Solid Waste Management Department | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घनकचरा विभागाकडून स्वच्छता मशाल रैली, श्रमदान, प्लागेथोन चे आयोजन 

Homeadministrative

PMC Solid Waste Management Department | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घनकचरा विभागाकडून स्वच्छता मशाल रैली, श्रमदान, प्लागेथोन चे आयोजन 

Ganesh Kumar Mule Oct 02, 2024 8:06 PM

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार
SHS 2023 | PMC Pune | स्वच्छता पंधरवडा स्वच्छता सेवा (SHS) २०२३ अंतर्गत 1 ऑक्टोबरला पुणे महापालिकेकडून मेगा ड्राईव्हचे आयोजन
Mahatma Gandhi | Lal Bahadur Shastri Jayanti | गांधीजी आणि शास्त्रीजी च्या जयंतीनिमित्त कसबा मतदार संघात १८६९ तुळस व गुलाब रोप वाटप

PMC Solid Waste Management Department | महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त घनकचरा विभागाकडून स्वच्छता मशाल रैली, श्रमदान, प्लागेथोन चे आयोजन

 

Mahatma Gandhi Jayanti – (The Karbhari News Service) – स्वच्छ भारत दिवस, राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांना आदरांजली म्हणून ०२ ऑक्टोबर  रोजी सकाळी ०७.०० ते ०९.०० या वेळेत पुणे शहराचे दक्षिणेकडील प्रवेश द्वार कात्रज बोगदा ने शनिवारवाडा यामार्गावर स्वच्छता मशाल रैली घेऊन विविध संस्था इनकलाब जयते, लव्ह केअर शेअर, जय जवान अकॅडेमी, वर्क फॉर कम्पयशन, फ्रीसोल, युवा यांना Handover करून यामार्गावर मानवी गाखळी, स्वच्छता रैली, स्वच्छता मोहीम आणि नागरिकांमध्ये जनजागृती निर्माण करण्यासाठी श्रमदान, प्लगिथॉन ड्राइव्ह इ. उपक्रम राबविण्यात आले. या उपक्रमात ५० हून अधिक संस्था NGO यांनी सहभाग नोंदविला. अशी माहिती महापालिका घनकचरा विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. (Sandip Kadam PMC)

स्वच्छता ही सेवा २०२४ अंतर्गत १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर  या कालावधीमध्ये स्वच्छता पंधरवडा अभियान राबविणेबाबत महाराष्ट्र नागरी विकास अभियान संचालनालयामार्फत कळविण्यात आले होते. त्या अनुषंगाने पुणे महानगरपालिकेच्या सर्व क्षेत्रिय  कार्यालयाकडील एकूण ४२ प्रभागांमध्ये १ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०८.०० ते २ ऑक्पटोबर पहाटे ०२.०० वा या वेळेत विशेष सूक्ष्म/खोलवर स्वच्छता मोहीमेचे (deep cleaning drive) आयोजन करण्यात आले. यामध्ये संपूर्ण पुणे
अहरान २३० ठिकाणी जवळपास ३२७२ विविध संस्थाचे प्रतिनिधी व अधिकारी / कर्मचा-यांनी सहभाग नोंदविला आहे. सदर सूक्ष्म / खोलवर स्वच्छता मोहीमेमध्ये ७९ टन सुका कचरा ३९ टन ओला कचरा व ३५१ टन राडारोडा गोळा करण्यात आला. तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांसमवेत आकाशचिन्ह, अतिक्रमण, उद्यान,
पाणीपुरवठा, गज, विद्युत व मोटार वाहन हे विभाग सहभागी झाले. त्याचप्रमाणे बंद केलेल्या Black Spot च्या ठिकाणी सुशोभीकरण करून क्षेत्रिय कार्यालयांतर्गत विविध स्वयंसेवी संस्था, शाळा/महाविद्यालयीन विद्यार्थी वचत गट, मा. सभासद, विविध मान्यवर व्यक्ती तसेच अॅम्बेसिडर यांना सहभागी करून घेऊन स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला.

या मानवी साखळी रैली व अभियानामध्ये सहभागी संस्थाच्या प्रतिनिधींचा सन्मान सोहळा शनिवारवाडा याठिकाणी मा. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचप्रमाणे स्वच्छता ही सेवा २०२४ अभियानाअंतर्गत स्वच्छता दिवस साजरा करणेकरीता विशेष कार्यक्रम सकाळी १०.३० ते दुपारी १२.३० वाजेपर्यंत घोले रोड आर्ट गॅलरी याठिकाणी आयोजित करण्यात आला होता. अतिरिक्त आयुक्त यांनी प्रस्ताविकामध्ये स्वच्छता ही सेवा अंतर्गत महानगरपालिकेने स्वच्छता
की भागीदारी, स्वच्छता लक्षित एकाई, सफाई मित्र सुरक्षा शिबीर उपक्रमाची माहिती याची माहिती दिली.


संत तुकाराम महाराज पालखी व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे आगमन झाल्यानंतर पुणे शहरातील वातावरण अनुभवणे हे एकप्रकारचे भाग्यच असते. पुणे शहरात येणाऱ्या या पालखी सोहळ्यानिमित्त शाळकरी विद्यार्थ्यांसाठी माझी वारी वेशभूषा स्पर्धा व खुल्या गटासाठी मी पाहिलेली वारी फोटोग्राफी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. त्याचप्रमाणे गणेशोत्सव म्हणजे मराठी माणसाचा त्यातही पुणेकरांच्या मनाचा ठाव घेणारा उत्सव! पुण्यामध्ये हा उत्सव अंत्यत श्रध्देने आणि मोठ्या भक्तीभावाने साजरा केला जातो. येथील गणेशोत्सव पाहण्यासाठी जगभरातून गणेशभक्त येतात. घरोघरी देखील आकर्षक सजावट  करण्यात येते. याच अनुषंगाने गणेशोत्सवाच्या निमित्ताने PMC CARE च्या वतीने वास घरगुती गणेशोत्सव सजावट स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या दोन्ही स्पर्धांचा परितोषिक वितरण समारंभ स्वच्छ भारत
दिवसाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आला आहे.

गणेशोत्सव २०२४ दरम्यान १५ क्षेत्रिय कार्यालयांतर्गत ५५९९५२ मूर्ती विसर्जन करण्यात आल्या. १७६०६७ मुर्त्या दान करण्यात आल्या. क्षेत्रिय कार्यालयांतर्गत सर्व कृत्रिम हौद व मूर्ती संकलनाच्या ठिकाणी निर्माल्य संकलनासाठी २९८ निर्माल्य कलश / कंटेनरची व्यवस्था करण्यात आल्याने एकूण ७०० टन  निर्माल्य संकलन झाले व या निर्माल्यातून खत निर्मिती करण्यात येत आहे.

आज  घोले रोड आर्ट गॅलरी याठिकाणी आयोजित समारोह सोहळयामध्ये गणेश गणेशोत्सव काळात व स्वच्छता ही सेवा पंधरवड्यात पुणे महानगरपालिकेसमवेत स्वच्छता की भागीदारी, स्वच्छता लक्षित इकाई व सफाई मित्र सुरक्षा शिवीर या उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विविध स्वयंसेवी संस्था व सर्व क्षेत्रीय कार्यालयांना गौरविण्यात आले. त्याचप्रमाणे उत्कृष्ट काम करणा-या सफाई सेवकांना गौरविण्यात आले आहे.

कार्यक्रम मुरलीधर मोहोळ, केंद्रीय राज्यमंत्री, सहकार आणि नागरी विमान वाहतूक, खासदार, पुणे लोकसभा, डॉ. सलील कुलकर्णी, सुप्रसिद्ध गीतकार, संगीतकार, गायक,
दिग्दर्शक, स्वच्छता ब्रँड अॅम्बेसेडर, महापालिका आयुक्त डॉ. राजेन्द्र भोसले, अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. मा. उपायुक्त संदीप कदम यांचे हस्ते संपन्न झाला.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0