PMC Employees Promotion | वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक पदाची पदोन्नती प्रक्रिया २ वर्षापासून प्रलंबित!   | आचारसंहितेच्या आधी पदोन्नती देण्याची मागणी

Homeadministrative

PMC Employees Promotion | वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक पदाची पदोन्नती प्रक्रिया २ वर्षापासून प्रलंबित! | आचारसंहितेच्या आधी पदोन्नती देण्याची मागणी

Ganesh Kumar Mule Sep 28, 2024 6:32 PM

Extension to apply for PMC Gunvant Kamgar Award to Pune Municipal Corporation (PMC) Employees
PMC Primary Education Department | पुणे महापालिकेच्या प्राथमिक शिक्षण विभागाकडील ३३६ कर्मचाऱ्यांचे कायम रिक्त पदावर समायोजन!
PMC Pension | पेन्शन प्रकरणाची प्रभारी नगरसचिवांकडून गंभीर दखल| | संबंधित बिल क्लार्कला २४ तासाच्या आत खुलासा करण्याचे आदेश

PMC Employees Promotion | वरिष्ठ लिपिक आणि लिपिक टंकलेखक पदाची पदोन्नती प्रक्रिया २ वर्षापासून प्रलंबित!

| आचारसंहितेच्या आधी पदोन्नती देण्याची मागणी

 

PMC Employees – (The Karbhari News Service) – पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation-PMC) वरिष्ठ लिपिक, लिपिक टंकलेखक पदावरील कर्मचाऱ्यांची पदोन्नती प्रक्रिया गेल्या दोन वर्षांपासून रखडली आहे. प्रशासनाकडून याबाबत वेळखाऊ धोरण अवलंबले जात आहे. त्यामुळे आता विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या आधी प्रक्रिया पूर्ण करुन पदोन्नती द्यावी. अशी मागणी पुणे महापालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून महापालिका आयुक्त यांच्याकडे करण्यात आली आहे. (Pune PMC News)

संघटनेच्या निवेदनानुसार पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढणेच्या अनुषंगाने विभागीय पदोन्नती समितीची बैठक प्रतिवर्षी सप्टेंबर महिन्यात आयोजित करून पदोन्नतीची पुढील कार्यवाही विनाविलंब पुर्ण करावी. असे आदेश सरकार कडून याआधीच देण्यात आले आहेत.

पदोन्नतीचे प्रस्ताव जलद गतीने निकाली काढणेसाठी विहित वेळापत्रकाचे पालन करणे जेणेकरून अधिकारी/कर्मचारी यांना पदोन्नतीसाठी पात्र असुनही, पदोन्नतीची कार्यवाही विहित वेळेत न केल्यामुळे त्यापुर्वीच सेवानिवृत्त होवून पदोन्नतीपासून वंचित रहावे लागणार नाही. असे परित्रक असतानाही गेल्या वर्षी वरिष्ठ लिपिक ते उपअधिक्षक या पदासाठी पदोन्नती समितीची बैठक आयोजित करणेत आलेली नव्हती. त्यामुळे उपधिक्षक पदाचे अनेक जागा रिक्त असुन अनेक कार्यालयात उपअधिक्षक नसल्याने कार्यालयीन कामाची गैरसोय होत आहे. तरी समहाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणूका या केव्हाही घोषित होवून आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, तरी सदर आचारसंहिता लागु होणेपूर्वी वरिष्ठ लिपिक ते उपअधिक्षक या पदासाठी पदोन्नतीची प्रक्रिया पुर्ण करणेसाठी पदोन्नती समितीची बैठक आयोजित करून पदोन्नतीची प्रक्रिया पुर्ण करणेत यावी. असे संघटनेने म्हटले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे कि, पुणे महानगरपालिका प्रशासनाकडील लेखनिकी संवर्गातील लिपिक टंकलेखक वर्ग-३ या हुददयावरील सेवकांची अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिध्द करणेत आलेली आहे. या सेवाज्येष्ठता यादीतील सेवकांना पदोन्नती देणेसाठी सामान्य प्रशासन विभागाने सर्व खातेप्रमुखांना व सेवकांना गोपनीय अहवाल व इतर माहिती पाठविणे बाबत अवगत करणेत आलेले आहे. सदर सेवाज्येष्ठता यादीतील बरेच खात्यांनी/सेवकांनी सामान्य प्रशासन विभागास माहिती सादर केलेली आहे. कागदपत्रे / अहवाल सादर करणेस पुरेसा वेळ ही सामान्य प्रशासन विभागामार्फत देणेत आलेला आहे. सेवाज्येष्ठता यादीतील सेवकांची सन २०२२ मध्येही पदोन्नतीसाठी कागदपत्रे मागविणेत आलेली होती, परंतु पदोन्नती समितीची बैठक आयोजित करून पदोन्नतीची प्रक्रिया पुर्ण करणेत आलेली नाही. त्यामुळे वरिष्ठ लिपिक पदाची बरेच जागा रिक्त असुन वरिष्ठ लिपिक नसल्याने अनेक कार्यालयीन कामकाजात गैरसोय निर्माण होत आहे. त्यामुळे पदोन्नती देण्यात यावी. असे संघटनेने म्हटले आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0