UNI World Labour Conference | UNI जागतिक कामगार परिषदेमध्ये सुनील शिंदे | विविध विभागातील कामगारांनी दिल्य शुभेच्छा

HomeBreaking News

UNI World Labour Conference | UNI जागतिक कामगार परिषदेमध्ये सुनील शिंदे | विविध विभागातील कामगारांनी दिल्य शुभेच्छा

Ganesh Kumar Mule Sep 20, 2024 7:59 PM

Pune Municipal Corporation | BLO म्हणून कामकाज करण्यास 73 महापालिका कर्मचाऱ्यांची टाळाटाळ | जिल्हा प्रशासनाकडून तक्रार
MLA Sunil Kamble | आरोग्यदूत आमदार सुनील कांबळे यांच्या पदयात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद
Loksabha Election 2024 Results | मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती

UNI World Labour Conference | UNI जागतिक कामगार परिषदेमध्ये सुनील शिंदे | विविध विभागातील कामगारांनी दिल्य शुभेच्छा

 

Sunil Shinde RMS – (The Karbhari News Service) – यु एन आय या जागतिक कामगार युनियनच्या प्रॉपर्टी सर्विसेस विभागाची जागतिक परिषद आयर्लंड देशातील ग्वालवे या शहरात 24 ते 26 सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली आहे. या परिषदेमध्ये जगातील 65 देशांमधील शंभर प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या परिषदेमध्ये भाग घेण्यासाठी भारतातून कामगार नेते व राष्ट्रीय मजदूर संघाचे अध्यक्ष सुनील शिंदे यांना निमंत्रित करण्यात आले आहे.

या परिषदेमध्ये सफाई कामगार, सुरक्षा रक्षक कामगार यांच्या प्रश्नांसंदर्भात जगातील प्रतिनिधी आपापले विचार व्यक्त करणार आहेत. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये असलेला सुरक्षा रक्षकांसाठीचा कायदा, त्याचप्रमाणे सफाई कामगारांसाठी असलेले कायदे या संदर्भामध्ये सुनील शिंदे आपले विचार या जागतिक व्यासपीठावर व्यक्त करणार आहेत.

त्याचबरोबर युके मधील लंडन या शहरातील मेट्रोमध्ये काम करणारे सुरक्षा रक्षक, तेथील ट्रान्सपोर्टेशन मध्ये काम करणारे सफाई कामगार व सुरक्षा रक्षक त्याचबरोबर तेथील महानगरपालिकेमध्ये काम करणारे कंत्राटी कामगार यांच्या युनियन प्रतिनिधींनी आयोजित केलेल्या बैठकीतही कामगार नेते सुनील शिंदे हे निमंत्रित करण्यात आले असून ते आपले विचार या ठिकाणी मांडणार आहेत. या बैठकीचे आयोजन इंटरनॅशनल ट्रान्सपोर्ट फेडरेशनने केलेले आहे. ही बैठक आय टी एफ हाऊस, लंडन येथे होणार आहे.

सुनील शिंदे यांना जागतिक परिषदेचे निमंत्रण मिळाल्याबद्दल येथील विविध विभागातील कामगारांनी त्यांना शुभेच्छा दिल्या.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0