Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे यंदाचे २२ वे वर्ष

Homecultural

Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे यंदाचे २२ वे वर्ष

Ganesh Kumar Mule Sep 17, 2024 9:38 PM

Pune Ganesh Immersion | उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मानाच्या गणपतींचे पूजन करून विसर्जन मिरवणुकीचा प्रारंभ
PMC Solid Waste Management Department | गणेश विसर्जन मिरवणुकी नंतर केलेल्या स्वच्छता अभियानात  ६७ टन कचरा व ३.५ टन चपला बूट केले गोळा! 
Sound Pollution Pune Ganesh Immersion | चला! गणेश विसर्जन मिरवणुकीत किमान ध्वनी प्रदूषण बाबत जागृती तर होऊ लागली |  विसर्जनात सरासरी ९४.८ डेसिबल आवाज

Shrinath Bhimale | श्रीनाथ भिमाले यांच्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमाचे यंदाचे २२ वे वर्ष

| पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो गणेश मुर्तींचे भिमाले उद्यान येथे विसर्जन

 

Pune Ganesh Immersion- (The Karbhari News Service) – पुणे लोकसभा समन्वयक प्रभारी तथा पुणे महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले यांनी पर्वती विधानसभा मतदारसंघातील घरगुती गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी भिमाले उद्यान येथे आयोजित केलेल्या पर्यावरण पूरक गणेश विसर्जन उपक्रमास या वर्षी देखील नागरिकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद पाहायला मिळाला. (Pune News)

पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो घरगुती बाप्पांचे या विसर्जन हौदात अतिशय मंगलमय वातावरणात विसर्जन पार पडले.

 

“घरगुती बाप्पांचे गणेश विसर्जन होत असताना विसर्जनाचे पावित्र्य जपले जावे, गणेश विसर्जनामुळे पर्यावरणाची हानी होऊ नये व पुण्यनगरीतील नद्यांमध्ये केमिकल, रंग यांमुळे होणारे प्रदूषण टाळण्यात यावे यासाठी काहीतरी ठोस उपाययोजना करण्यात यावी” या हेतूने पुणे शहरात सर्वप्रथम 2002 साली श्रीनाथ भिमाले यांनी विसर्जन हौदाची संकल्पना मांडली. त्यावेळी सुमारे एक लाख लिटर पाणी क्षमता असलेला विसर्जन हौद सॅलिस्बरी पार्क भागात भिमाले उद्यान येथे बांधण्यात आला.

 

यानंतर हा अभिनव उपक्रम पुणे महानगरपालिकेने सर्वच प्रभागांमध्ये राबविला.
आज देखील पर्वती विधानसभा मतदारसंघातील हजारो घरगुती बाप्पांचे विसर्जन या विसर्जन हौदात अतिशय मंगलमय वातावरणात संपन्न झाले. अबाल वृद्धांसह सर्वच नागरिकांनी मोठ्या उत्साहात या विसर्जन सोहळ्यामध्ये सहभाग नोंदवला.या उपक्रमात सहभागी सर्व नागरिकांना श्रीनाथ भिमाले यांच्या वतीने वृक्ष संवर्धनासाठी सेंद्रिय खतांचे वाटप करण्यात आले.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0