DIO Pune | जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू

Dr Ravindra Thakur DIO Pune

HomeBreaking News

DIO Pune | जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू

Ganesh Kumar Mule Aug 27, 2024 4:43 PM

Pune District Draft Plan | पुणे जिल्ह्याच्या 1 हजार 128 कोटी 84 लाख रुपयांच्या प्रारुप आराखड्यास मान्यता
Pune News | पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या चेअरमन पदी कविता कांबळे (खरात)यांची निवड
Vidhansabha Election Pune District | विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २२ ऑक्टोबरपासून उमेदवारी अर्ज स्वीकृती | जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदार संघनिहाय निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयांचे पत्ते जाहीर

DIO Pune | जिल्हा माहिती अधिकारी पदी डॉ. रवींद्र ठाकूर रुजू

 

Dr Ravindra Thakur – (The Karbhari News Service) – पुणे जिल्ह्याचे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून डॉ. रवींद्र ठाकूर यांनी पदभार स्वीकारला. यावेळी मावळते जिल्हा माहिती अधिकारी डॉ. किरण मोघे यांनी त्यांचे स्वागत करून पदभार सोपवला.

डॉ. रवींद्र ठाकूर हे मूळ नाशिकचे असून त्यांनी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून वृत्तपत्र विद्या शाखेत पदव्युत्तर पदवी संपादित केली आहे. त्यांनी जनसंपर्क क्षेत्रात पी.एच.डी. केली आहे. तसेच त्यांनी वृत्तपत्र क्षेत्रात अध्यापनाचे कामही केले असून सुरुवातीला दैनिक जनशक्ती, देशदूत या वृत्तपत्रात पत्रकारिता केली आहे. जनसंपर्क अधिकारी म्हणूनही त्यांनी काम केले आहे. ते २००७ मध्ये माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या सेवेत दाखल झाले असून अलिबाग–रायगड, मंत्रालय मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजी नगर येथे त्यांनी यापूर्वी काम केले आहे. आता अहमदनगर येथून त्यांची पुणे जिल्हा माहिती अधिकारी पदी नियुक्ती झाली आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0