Aapli PMPML | स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून “आपली पीएमपीएमएल” या मोबाईल ऍप चे उद्घाटन होणार
PMPML Pune – (The Karbhari News Service) – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (PMPML) “आपली पीएमपीएमएल” या मोबाईलअॅपचे उद्घाटन दि. १५ ऑगस्ट २०२४ रोजी स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिवहनमहामंडळाच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडेयांच्या हस्ते करणेत येणार असून प्रवाशांच्या सेवेत “आपली पीएमपीएमएल” हेमोबाईल अॅप १७ ऑगस्ट पासून सुरू होणार आहे. (Pune PMP News)
सदरचे मोबाईल अॅप हे गुगल प्ले स्टोअर वर “Apli PMPML” या नावानेउपलब्ध असून अॅन्ड्रॉईड मोबाईल मध्ये डाऊनलोड करता येईल.
“आपली पीएमपीएमएल” या मोबाईल अॅपची ठळक वैशिष्ट्येपुढीप्रमाणेः-
– सर्व बसमार्गांची माहिती समजणारः-
प्रवाशांना त्यांच्या करंट लोकेशन वरून इच्छित स्थळी जाणेसाठी आवश्यकअसलेल्या बसमार्गाची माहिती मोबाईल अॅप वर समजणार.
– बसचे लाईव्ह ट्रॅकिंग होणारः-
मोबाईल अॅप मधून बसचे लाईव्ह लोकेशन प्रवाशांना दिसणार आहे. यामुळेबस थांब्यावर किती वेळात येणार हे देखील समजणे शक्य होणार आहे.
– ऑनलाईन तिकीट काढता येणारः-
सदर मोबाईल अॅप वरून प्रवाशांना ऑनलाईन तिकीट युपीआय द्वारे बुककरता येईल.
– दैनंदिन पास देखील काढता येणारः-
सदर मोबाईल अॅप वरून प्रवाशांना रू. ४०, रू.५० व रू. १२० चे दैनंदिन पासकाढता येणार आहेत.
– तक्रार नोंदविता येणारः-
सदर मोबाईल अॅप वरून प्रवाशांना त्यांच्या तक्रारी देखील नोंदविता येणारआहेत.
– “आपली पीएमपीएमएल” मोबाईल अॅप वरून मेट्रो तिकीट देखील काढता येणार
“आपली पीएमपीएमएल” मोबाईल अॅप वरून प्रवाशांना मेट्रो चे तिकीटदेखील काढता येणार आहे.
तरी जास्तीत जास्त प्रवाशी नागरिकांनी “Apli PMPML” या मोबाईलअॅपचा वापर करावा असे आवाहन परिवहन महामंडळाकडून करणेत आले आहे.
तसेच स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून परिवहन महामंडळाच्या गुणवंत कामगारव अधिकाऱ्यांचा सत्कार देखील अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक दिपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते करणेत येणार येणार आहे.
COMMENTS