PMC : Taljai hills : तळजाई टेकडी प्रकल्पात वृक्षतोड नाही  : महापालिका उद्यान विभागाचे स्पष्टीकरण 

HomeपुणेPMC

PMC : Taljai hills : तळजाई टेकडी प्रकल्पात वृक्षतोड नाही  : महापालिका उद्यान विभागाचे स्पष्टीकरण 

Ganesh Kumar Mule Oct 19, 2021 11:46 AM

Yerwada, Kalas, Dhanori : MLA Sunil Tingre : पुराचे पाणी शिरु नये यासाठी अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांवर अमल करावा : आमदार सुनिल टिंगरे यांचे निर्देश
TP Scheme | उरुळी देवाची  व फुरसुंगी  टीपी स्कीम | हरकती सूचनांचा अहवाल सरकारकडे पाठवला जाणार 
Chhatrapati Shivaji Maharaj Nagar : शिवाजीनगरचा नामविस्तार ‘छत्रपती शिवाजी महाराज नगर’ होणार : मात्र ही असेल अट 

तळजाई टेकडी प्रकल्पात वृक्षतोड नाही

: महापालिका उद्यान विभागाचे स्पष्टीकरण

पुणे : सहकारनगर भागातील भागातील पुण्याच्या ऑक्सिजन मानला जाणाऱ्या तळजाई टेकडीवर १०७ एकर जागेवर नियोजित जैवविविधता वसुंधरा प्रकल्पाचा विस्तृत प्रकल्प तयार होणार आहे. परंतु मनोरंजनाच्या नावाखाली तळजाईवर गर्दी करून निसर्गाची हानी होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे. मुळात हे नैसर्गिक जंगल असताना, पुरेशी जैवविविधता असताना झाडे तोडून रस्ते व बांधकाम करून कोणती जैवविविधता निर्माण करण्यात येणार? असा प्रश्न पर्यावरण प्रेमी आणि नागरिकंनाकडून विचारला जात होता. त्यावरच  महानगरपालिकेच्या उद्यान विभागाने स्पष्टीकरण दिले आहे.

वृक्ष संपदा महापालिकेकडून जपण्यात येणार

तळजाईवर उभारण्यात येणाऱ्या जैवविविधता उद्यान प्रकल्पामध्ये दुर्मिळ वृक्ष तसेच स्थानिक /भारतीय वृक्ष संपदा महापालिकेकडून जपण्यात येणार आहे. तसेच १९८७ च्या डीपी (विकास आराखडा) नुसार याठिकाणी असलेले हिल टॉप हिल स्लोप झोनचे आरक्षण कायम ठेवण्यात आले आहे. अशी माहिती महापालिकेच्या मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सदर प्रकल्पाचा अहवाल स्थायी समितीसमोर मान्यतेसाठी सादर करण्यात आला असून, समितीच्या आदेशानुसार त्याचे लवकरच सादरीकरण करण्यात येणार असल्याचे उद्यान विभागाने सांगितले आहे. या प्रकल्पामध्ये बांबू उद्यान, नक्षत्र उद्यान, जैवविविधता उद्यान, फ्लॉवर गार्डन, अरोमा गार्डन, रानमेवा उद्यान, सेंद्रिय शेती, पक्षी निरीक्षण केंद्र, आदी सुविधा उभारण्यात येणार असून, मोठ्या प्रमाणात वृक्षलागवड करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. हे करीत असताना कुठलीही वृक्षतोड न करता, जास्तीच कॉंक्रिटीकरण करण्यात येणार नाही़ तसेच येथील जॉगिंग ट्रॅकही मातीचेच करण्यात येणार आहे. नैसर्गिक साधन संपत्तीमध्ये याठिकाणी वाढ करून प्रकल्पामध्ये सर्व सोयीसुविधा उभारून नागरिकांना त्यांच्या आरोग्य व मनोरंजन याकरिता या प्रकल्पाचे नियोजन करण्यात आले असल्याचा दावा उद्यान विभागाने केला आहे.

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0