शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ, ही घोषणा कुठे गेली अजितदादा…
: शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचा सवाल
पुणे : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी निवडणुकीच्या वेळेस राज्यातील तमाम शेतकरी कष्टकरी कामगारांना विश्वासात घेताना भाजपा सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती व लाईट बिल वीज मुक्ती दिली नाही, असा आरोप केला होता. त्यावेळी अजित पवार यांनी महाराष्ट्र राज्यात निवडणूका लढवताना आमचा पक्ष सत्तेत आला तर आम्ही शेतकऱ्यांना कर्जमुक्तीची आश्वासन न देता डायरेक्ट आम्ही सर्व शेतकऱ्यांना पहील्या कॅबिनेट मधे कर्जमाफी देऊ अशा पद्धतीचे आश्वासने देऊन शेतकऱ्यांकडून मतांची मदत घेतली. मात्र आता ती घोषणा कुठे गेली? असा सवाल शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विठ्ठल पवार राजे यांनी अजित पवार यांना केला आहे.
: तत्काळ द्या कर्जमाफी
पवार राजे पुढे म्हणाले, शेतकऱ्यांना हमीभाव देऊ ऊसाला भरघोस एफआरपीपेक्षा जादा पैसे देऊ. त्यानंतर दुधाला हमीभाव देऊन सगळ्या गोष्टीच्या वल्गना केलेल्या सर्व कॅसेट सर्व बातम्या सर्व त्यांच्या बातम्यांचे कात्रण शेतकरी संघटनेकडे आहेत हे सगळं असताना आज .दोन वर्षे झाली हा पक्ष सत्तेवर ती आहे. ठीक आहे कोविडचं कारण होतं पण कोविड मध्ये महसूल वसुलीत कोणत्याही प्रकारे फरक पडला नाही. की महसूल कमीही झाला नाही. यांचा एक एक मंत्री दिवसाला महिन्याला शंभर शंभर कोटी रुपये वसूल करत असताना तो सापडला जातो आणि परवा अजितदादा पवार साहेब उपमुख्यमंत्री म्हणतात की शेतकऱ्यांना कर्ज माफी साठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. पैसे आल्याशिवाय आम्ही कर्जमुक्ती देऊ शकत नाही पण अजितदादा पवार साहेब हे निवडणुकीच्या वेळेस काय बोलले होते त्याची आठवण मी तुमच्या मीडियाच्या माध्यमातून त्यांना करून देणे आवश्यक आहे. त्यावेळेस ते शेतकरी कष्टकरी कामगारांना आणि शेतकऱ्यांना खास करून बोलले की आमचा पक्ष सत्तेत आल्यानंतर शेतकऱ्यांना सरसकट संपूर्ण कर्जमुक्ती मुक्त करेल आणि शेतकऱ्यांना कर्ज, विजमाफी देईल. आणि मी जर शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही तर आम्ही आमच्या बापाची अवलाद सांगणार नाही.? अशा प्रकारचं वार्तांकन त्यांनी जाहीर सभेमध्ये केलं होतं.! मोठ्या पवार साहेबांनी देखील विज बिल भरु नका, कर्जही भरु नका, आणी संदर्भामध्ये शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ अशा पद्धतीनचं त्यांच्या सर्वच नेत्यांनी त्यांचे हवसे गवसे नवसे असे सगळे नेत्यांनी त्याच्यामध्ये हो करत शेती कर्ज विज बिल माफ केलंच समजा अशाप्रकारचे चे शब्द शेतकऱ्यांना दिले होते. अजितदादा चे सरकार सत्तेवर आलंही आता त्यांचे सरकारकडं शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीयेत, कष्टकऱ्यांसाठी पैसे नाहीत, कामगारांसाठी पैसे नाहीये, त्च्याचेकडे मात्र आता आमदारांना यांनी एक एक कोटीचा अधिकचा निधी द्यायला यांच्याकडे पैसे आहेत.
या सरकारने शेतकऱ्यांना कुठलीही सबब न सांगता सरसकट कर्जमाफी द्यावी रेगुलर कर्ज भरणाऱ्यांना कर्जमाफी अनुदान पॅकेज दिले पाहिजे. अशा पद्धतीचा पत्र व्यवहार मी जवळपास दहा पंधरा वेळा राज्य व केंद्र सरकारला केलेला आहे. कर्जमाफी दिल्याशिवाय, घेतल्या शिवाय या सरकारला आता शरदजोशी विचारमंच शेतकरी संघटना सोडणार नाही. असे ही पवार राजे म्हणाले.
COMMENTS
द कारभारी या वृत्तपत्रात शरद जोशी विचारलं शेतकरी संघटनेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा आपण सातत्याने शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या व्यथा शासन प्रशासनाच्या दरबारी मांडून त्यांना न्याय मिळवून देतात याबद्दल मी प्रदेशाध्यक्ष या नात्याने विठ्ठल पवाराचे आपल्या या द कारभारी या वृत्तपत्राचे या पोर्टलचा मी मनापासून असो अभिनंदन करतो आपणास शुभेच्छा देतो
धन्यवाद
द कारभारी
आपले खूप धन्यवाद …!
द कारभारी ; आपण योग्य मुद्दा मीडियाद्वारे उपस्थित केलेला आहे.
यातून महाविकासआघाडी जाणते नेते नक्कीच करतील अशी अपेक्षा बाळगू न केल्यास आपण पाठपुरावा करावा.
नक्कीच … धन्यवाद