बोपोडीत ऑक्सिजन निर्मिती प्लांट चे उद्घाटन
उपमहापौर सुनिता वाडेकर यांच्या पाठपुराव्याला यश
पुणे : महानगरपालिकेच्या उपमहापौर सुनिता परशुराम वाडेकर यांच्या पाठपुराव्याने पुणे महानगरपालिका व हनीवेल इंडिया यांच्या सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून प्रभाग क्र.८ बोपोडी मध्ये कै.द्रौपदाबाई खेडेकर दवाखाना व प्रसूतीगृह बोपोडी येथे ६०० लीटर निर्मिती क्षमतेच्या व ३००० लीटर साठवणूक क्षमतेच्या ऑक्सिजन निर्मिती प्लांटचे उदघाटन पुण्यनगरीचे महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
: मुंबई पुणे रस्त्याच्या रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न लवकर मार्गी लावावा : वाडेकर
कोविड १९ ची संभाव्य लाट लक्षात घेता उपमहापौर सुनिता वाडेकर या गेल्या सहा ते सात महिन्यापासून तत्कालीन अतिरिक्त महापालिका आयुक्त रुबल अगरवाल व सध्याचे अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्याकडे बोपोडी कै.संजय गांधी रुग्णालयाचे बांधकाम व अद्ययावत सुविधा व्हाव्यात व दोन्ही रुग्णालये एकत्रित कार्यान्वीत करावीत यासाठी निधी उपलब्ध व्हावा अशी मागणी सातत्याने करीत होत्या.त्यांच्या मागणीची व पाठपुराव्याची दखल घेत आज या ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पाचे पूर्ण क्षमतेने लोकार्पण करण्यात आले.याप्रसंगी बोलताना अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांनी कै.संजय गांधी रुग्णालयाचे बांधकाम पूर्णत्वास आले असून लवकरच अद्ययावत सोयी सुविधासह हे रुग्णालय येत्या दोन महिन्यात कार्यान्वित होईल असे आश्वासन दिले. आभारपर बोलताना उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी सर्वांचे आभार मानत पुण्याच्या प्रवेशद्वारावर बोपोडी येथे जुन्या मुंबई पुणे रस्त्याच्या रुंदीकरणाचा रखडलेला प्रश्न लवकर मार्गी लावावा अशी आगणी महापौर व अतिरिक्त महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे यांच्याकडे केली. या कार्यक्रम प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सुनिता वाडेकर विरोधी पक्षनेते दीपाली धुमाळ रिपाई नेते परशुराम वाडेकर अतिरिक्त, महापालिका आयुक्त रविंद्र बिनवडे,नगरसेविका मा.अर्चनाताई मुसळे आरोग्य प्रमुख डॉ.आशिष भारती,हनिवेल इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक आशिष गायकवाड,हनिवेल इंडियाचे पदाधिकारी अमेरिकेयरचे अधिकारी व सर्व डॉक्टर कर्मचारी,व महानगरपालिका कर्मचारी आदी उपस्थीत होते.
—
COMMENTS