7th pay commission: PMC : अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मनपा आयुक्तांचे परिपत्रक जारी

HomeपुणेBreaking News

7th pay commission: PMC : अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मनपा आयुक्तांचे परिपत्रक जारी

Ganesh Kumar Mule Nov 11, 2021 11:03 AM

 Important news for Pune Municipal Corporation employees |   Circular issued regarding the payment of the third installment of the 7th Pay Commission!
PMPML Employees | पीएमपीएलच्या बदली कर्मचाऱ्यांना सेवेत कायम रुजू करण्यावर शिक्कामोर्तब! | फरकाची रक्कम चार टप्प्यात देणार
PMC Retired Employees | सेवानिवृत्त झालेल्या सेवकांची सेवापुस्तके आवश्यक कागदपत्रांसह पाठवण्याचे आदेश | मुख्य लेखा व वित्त अधिकाऱ्यांचे सर्व विभागांना आदेश

अखेर सातवा वेतन आयोग लागू करण्याचे मनपा आयुक्तांचे परिपत्रक जारी

: नोव्हेंबर पेड इन डिसेंबर पासून वेतन लागू करण्याचे आयुक्तांचे आदेश

पुणे: महापालिका कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे. सप्टेंबर महिन्यात राज्य सरकारने याला मान्यता दिली आहे.  मात्र महापालिका आयुक्तांकडून त्याबाबतचे परिपत्रक जारी करण्यात आले नव्हते. महापालिका कर्मचारी संघटनेच्या मागणीनुसार सातव्या वेतन आयोगाचा लाभ नोव्हेंबर पेड इन डिसेंबर  देण्याबाबतचा प्रस्ताव मनपा प्रशासनाने तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर बुधवारी ठेवला होता. आयुक्तांची त्यावर गुरुवारी सही झाली असून तात्काळ परिपत्रक काढण्यात आले आहे. त्यामुळे आता कर्मचाऱ्यांची वेतन आयोगाचा लाभ मिळण्याची प्रतीक्षा संपली असून त्यांना आता सुधारित वेतन नोव्हेंबर महिन्यापासून लागू होणार आहे.

: प्रशासनाने ठेवला होता प्रस्ताव

महापालिका कर्मचाऱ्यांच्या वेतन आयोगाचा प्रस्ताव बरेच दिवस महापालिका आणि पुन्हा राज्य सरकारकडे पडून होता. अखेर सप्टेंबर  महिन्यात वेतन आयोग राज्य सरकारकडून लागू करण्यात आला आहे. आयोगाला मंजुरी मिळून बरेच दिवस झाले तरी महापालिका प्रशासनाकडून याबाबत कुठलीही हालचाल करण्यात आलेली नव्हती.  याबाबत  स्थायी समितीच्या बैठकीत काही सदस्यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता. त्यांनतर  वेतन निश्चितीकरणाची प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. नंतर या कामास गती देण्यात आली होती. आता हे काम पूर्णत्वास आले आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने सातव्या वेतन आयोगाचा लाभ नोव्हेंबर पेड इन डिसेंबर  देण्याबाबतचा प्रस्ताव तयार करून तो अंतिम मंजुरीसाठी आयुक्त विक्रम कुमार यांच्यासमोर ठेवला होता. आयुक्तांनी त्यानुसार सुधारित वेतन देण्याचे परिपत्रक जारी केले आहे.

: असे आहे परिपत्रक

राज्यातील महानगरपालिकांमधील अधिकारी/कर्मचारी यांना सातवा वेतन आयोगाच्या शिफासरशीनुसार सुधारित
वेतन श्रेणी लागू करण्याची कार्यवाही संदर्भ क्र.१ अन्वये विहित करण्यात आली आहे. सदर शासन निर्णयानुसार पुणे महानगरपालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करणेस संदर्भ क्र.२ अन्वये मा. स्थायी समिती ठ.क्र. ४४१ दि १८/०८/२०२० व संदर्भ क्र.३ अन्वये मा मुख्य सभा ठराव क्र २५७ दि. १०/०३/२०२१ अन्वये मान्यता प्राप्त झालेली आहे
उपरोक्त मान्यतेस अनुसरुन जा.क्र.मआ/मुले/८६७ दि.०८/०६/२०२१ अन्वये नगर विकास विभाग महाराष्ट्र शासन याच्या मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करण्यात आला होता.
सदर प्रस्ताव संदर्भ क्र ४ अन्वये महाराट्र शासन नगर विकास विभाग क्र.पीएमसी -२०२१ /प्र क्र. १८७/ नवि-२
दिनांक १६/९/२०२१अन्वये मंजूर करण्यात आला आहे. ७ व्या वेतन आयोगाचा लाभ आकृतीबंधानुसार मंजूर पदावरील पुणे महानगरपालिकेकडील कार्यरत अधिकारी/कर्मचारी यांना देणे तसेच दि.०१/०१/२०१६ ते शासन निर्णयाच्या दिनांकापर्यंत सेवानिवृत्त झालेले आहे/ मृत पावलेल्या पुणे महानगरपालिकेकडील अधिकारी/कर्मचारी यांना मंजूर पदावरील कर्मचा-यांना ७ व्या वेतन आयोगाचा लाभ देणे व त्यानुसार सेवानिवृतीवेतन सुधारित करणे आवश्यक आहे.

पुणे महानगरपालिकेकडील अधिकारी/कर्मचारी यांना सदर मंजूर केलेल्या प्रस्तावातील अटीनुसार  नियमावली व अनुसुची नुसार माहे नोव्हेबर पेड इन डिसेंबर या माहे पासून  दर महा वेतन अदा करण्याची कार्यवाही करण्यात यावी.

: 10 महिन्यांचा वेतनातील फरक नंतर दिला जाणार

दरम्यान या परिपत्रकात 10 महिन्यांचा वेतनातील तफावतीचा उल्लेख केलेला  नसला तरी सरकारच्या आदेशानुसार हा फरक डिसेंबर महिन्यात मिळण्याची शक्यता आहे. तसेच पाच वर्षाचा फरक हा पुढील पाच वर्षात कर्मचाऱ्यांच्या प्रॉव्हिडंट फंडात जमा होणार आहे.
महापालिका कर्मचारी आणि अधिकारी यांना सातव्या वेतन आयोगाचा लाभ देण्याचे परिपत्रक अखेर महापालिका आयुक्तांनी जारी केले आहे. महापालिकेच्या सर्वच कर्मचारी संघटनांनी याबाबत पाठपुरावा केला होता. शिवाय यासाठी महापालिकेतील पदाधिकारी आणि विरोधी पक्ष नेत्यांची देखील मोलाची मदत झाली. यामुळे आता कर्मचारी व अधिकारी वर्ग खुश आहे.
   : प्रदीप महाडिक, अध्यक्ष, पीएमसी एम्प्लॉईज युनियन 

COMMENTS

WORDPRESS: 0
DISQUS: 0