Tamhini Ghat Bus Accident | ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक !

HomeBreaking Newsपुणे

Tamhini Ghat Bus Accident | ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक !

कारभारी वृत्तसेवा Dec 31, 2023 12:39 PM

Pune City Shiv Sena and Eknath Shinde Foundation distributed sanitary napkins to students in PMC  School
Sanitary Napkins in PM Schools | पुणे शहर शिवसेना व एकनाथ शिंदे फाउंडेशन कडून पुणे महापालिका शाळेत विद्यार्थिनींना सॅनिटरी नॅपकिन वाटप 
Pramod Nana Bhangire | शिवसेना शहराध्यक्ष नाना भानगिरे यांचा मदतीचा हात | एकनाथ शिंदे फाउंडेशन बाळासाठी ठरलं देवदूत..!!

Tamhini Ghat Bus Accident | ताम्हिणी घाटातील अपघातग्रस्तांसाठी देवदूतांसारखे धावून आले एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक !

 

Tamhini Ghat Bus Accident | पुण्यात मराठवाडा व उत्तर महाराष्ट्रातून आलेल्या, २०-२५ वर्षीय वयोगटातील ए. सी. एच. प्रायव्हेट लिमिटेड (ACH private limited Company) कंपनीतील कर्मचाऱ्यांचा पर्यटनासाठी हरिहरेश्वरला (Harihareshwar) जातांना ताम्हिणी घाटात (Tamhini Ghat) भीषण अपघात झाला, बेदरकार पद्धतीने बस चालविल्याने अपघात घडल्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी सांगितले. हा अपघात एवढा भीषण होता दोन युवती घटनास्थळीच ठार झाल्या असून प्रवास करीत असलेल्या सर्वच 55 कर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. (Eknath Shinde Foundation)

दरम्यान, बस अपघाताची घटना कळताच माणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी धाव घेऊन, लोकल रेस्क्यू टीम तयार करून, अपघातातील सर्व जखमी रुग्णांना जवळच असलेल्या माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले व त्यांच्यावर अत्यावश्यक औषध उपचार सुरू करण्यात आले.

मात्र पुढील प्रश्न अतिशय कठीण होता कारण या कंपनीत काम करणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी आपण नेटवर्क मार्केटिंग सारख्या कंपनीत काम करत आहोत व पर्यटनासाठी बाहेर गावी जाणार असल्याचे आपल्या कुटुंबियांना सांगितले नव्हते. त्यामुळे मदतकार्य राबविणे हे तितकेच अवघड होते.

ही बातमी ज्या पद्धतीने सर्वत्र वाऱ्यासारखी पसरली त्याक्षणीच देवदूता सारखे एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे स्वयंसेवक घटनास्थळी अपघातग्रस्तांसाठी धावून आले. अपघातग्रस्तांच्या अंगावरील जखमा, भीतीने अस्वस्थ असलेले चेहऱ्यावरील भाव आणि लटलट कापणारे ते अंग हे सर्व दृश्य मन खिन्न करून टाकणारे होते. कुटुंबियांना कुठलीच माहिती नसतांना एवढा भीषण प्रसंग या कर्मचाऱ्यांवर ओढवला होता, यावेळी त्यांना धीर देवून या धक्क्यातून सावरण्याचे लीलया काम एकनाथ शिंदे फाऊंडेशनच्या स्वयंसेवकांनी पार पाडले.

 

दरम्यान, यावेळी एकनाथ शिंदे फॉउंडेशनच्या स्वयंसेवकांनी पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील यांची भेट घेत,अपघातग्रस्तांना हव्या असणाऱ्या योग्य त्या मदतीबाबत माहिती घेण्यात आली, यावेळी अपघाताच्या धक्क्याने घाबरलेल्या तरुणी सकाळपासून जेवल्या नव्हत्या त्यांना जेवण पोहचवण्याची व्यवस्था करून किरकोळ मार लागलेल्या कर्मचाऱ्यांना सुखरूप घरी सोडण्यासाठी एकनाथ शिंदे फाऊंडेशनच्या वतीने खाजगी गाडीची व्यवस्था करून देण्यात आली, अनेक कर्मचारी गंभीर जखमी झाले होते,घटनेची भीषणता लक्षात घेता, माणगाव उपजिल्हा रुग्णालयात तेवढ्या क्षमतेचा वैद्यकीय साठा व साधनसामग्री उपलब्ध नसल्याने, गंभीर जखमी असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी दुसऱ्या रुग्णालयात हलवावे लागणार होते, तात्काळ एकनाथ शिंदे फाऊंडेशनच्या वतीने रुग्णवाहिकांची व्यवस्था करून सर्व रुग्णांना मुंबई-पुणे येथील रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या गंभीर स्वरूपाचे काही रुग्ण मुंबईजवळील पनवेलमध्ये एम.जी.एम रुग्णालयात व पुण्यातील ससून रुग्णालायत उपचार घेत आहेत.

दरम्यान, एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे संस्थापक प्रमोद नाना भानगिरे यांच्या वतीने ही सर्व मदत करण्यात आली. यावेळी एकनाथ शिंदे फाऊंडेशनचे निवास गायकवाड, शुभम पांचाळ, तुषार केंगाळे, प्रसाद जाधव, आयुष सोनवणे, कृष्णा सुर्वे व इतर स्वयंसेवक घटनास्थळी मदतीसाठी उपस्थित होते.