Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 

HomeBreaking Newsपुणे

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण 

कारभारी वृत्तसेवा Dec 12, 2023 1:24 PM

Drinking water | पुणे शहराचे पाणी कमी करू नका | पिण्याच्या पाण्याला प्राथमिकता द्या | महापालिकेची जलसंपदा विभागाकडे मागणी
PMC Water Budget | महापालिकेकडून 20.90 टीएमसी पाणी देण्याची मागणी ; पण पाटबंधारेने मात्र फक्त 12.82 TMC पाणी कोटा केला मंजूर
Water Uses | महापालिकेच्या ज्यादा पाणी वापरामुळे पाणीटंचाई! | जलसंपदा विभागाने राज्य सरकारकडे केली महापालिकेची तक्रार

Pune Water Crisis | पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेणार! | पाणीपुरवठा विभाग प्रमुखांचे स्पष्टीकरण

Pune Water Crisis | PMC Pune | यंदा उन्हाळ्यात जाणवणारी पाणीटंचाई लक्षात घेता जलसंपदा विभागाने (Department of Water Resources) पुणे महापालिकेला (Pune Municipal Corporation) मोठया प्रमाणात पाणीकपात करण्याच्या सूचना केल्या आहेत. मात्र महापालिकेला असे करणे परवडणारे नाही. नागरिक आणि राजकीय लोकांचा रोष महापालिकेला सहन करावा लागणार आहे. त्यामुळे महापालिकेने संयत  भूमिका घेत सध्या तरी पाणीकपात करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. पाणीकपाती बाबत महापालिका आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. असे  पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता नंदकिशोर जगताप (Chief Engineer Nandkishor Jagtap) यांनी The Karbhari शी बोलताना सांगितले. (Pune Water Cut)
शहरी आणि ग्रामीण भागात यंदा कमी पाऊस झाला आहे. जरी पुणे शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे पूर्ण क्षमतेने भरली असली तरी डिसेंबर पासून दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करण्याच्या सूचना पाटबंधारे विभागाकडून (Department of Water Resources) महापालिकेला (PMC Pune) करण्यात आल्या आहेत. (PMC Pune News)

जलसंपदा विभागाने म्हटले आहे कि, सद्यस्थितीतखडकवासला प्रकल्पामध्ये ७६८.२८ दलघमी ( २५.२२ टीएमसी) पाणीसाठा शिल्लक आहे. रब्बी हंगाम २०२३-२४ साठी लागणारे पाणी ८.५४ टीएमसी वजा जाता १६.६८ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहतो. कालवा सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये पुणे मनपास २७४ दिवसांसाठी १६२५ एमएलडी प्रमाणे २०.९४ टीएमसी पाणीसाठा राखीव ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. परंतू सध्याच्या पाणीवापराप्रमाणे पुणे मनपास २४४ दिवसांसाठी १३०० ते १२५० एमएलडी प्रमाणे २.८० ते
३.२३ टीएमसी इतका पाणीवापर होईल. म्हणजे पालिकेला दररोज 250-300 एमएलडी पाणीकपात करावी लागणार आहे. दरम्यान जलसम्पदा विभागाच्या पत्रावर पालिकेने अजून कुठला निर्णय घेतलेला नाही. याबाबत जगताप यांनी सांगितले कि पाणीकपाती बाबत आयुक्तांशी चर्चा करूनच निर्णय घेतला जाणार आहे.

| महापालिका 200 एमएलडी पाणी वाचवणार

जगताप यांनी सांगितले कि महापालिका येत्या 8 दिवसात कुठलीही कपात न करता महापालिका 150 MLD पाणी बचत करणार आहे. कारण फुरसुंगी गावाला 172 एमएलडी पाणी कॅनॉल मधून दिले जाते. खडकवासला धरणातून हे पाणी दिले जाते. फुरसुंगी गावाची गरज ही 22 एमएलडी ची आहे. मात्र पाणी गळती जमेस धरून एवढे पाणी सोडावे लागते. मात्र आता हे पाणी बंद पाईपलाईन मधून घेतले जाणार आहे. बंद पाईपलाईन झाल्याने महापालिका फक्त आवश्यक 22 एमएलडी च पाणी उचलणार आहे. बाकी 150 एमएलडी पाणी बचत होणार आहे. तसेच जगताप यांनी सांगितले कि अजून 50 एमएलडी पाण्याची बचत आम्ही करू शकतो. असे 200 एमएलडी पाणी आम्ही बचत आम्ही कुठलीही कपात न करता करणार आहोत. याबाबत लवकरच पाटबंधारे विभागाला अवगत केले जाईल.