PMC : शहरातील साहित्यिक कट्टे सुरु करा : दीपाली धुमाळ

HomeपुणेPMC

PMC : शहरातील साहित्यिक कट्टे सुरु करा : दीपाली धुमाळ

Ganesh Kumar Mule Oct 13, 2021 3:00 AM

PMC Chief Engineer | मुख्य अभियंता पदासाठी पदोन्नती समितीने नंदकिशोर जगताप यांची केलेली शिफारस आक्षेपार्ह असल्याचा आरोप
10th, 12th Students Scholarship : दोन दिवसात विद्यार्थ्यांच्या खात्यात शिष्यवृत्ती जमा होणार 
Marathon : PMC : मॅरेथॉन च्या पारितोषिकांसाठी 35 लाख देणार महापालिका! 

शहरातील साहित्यिक कट्टे सुरू करण्यात यावे

विरोधीपक्ष नेत्या दिपाली धुमाळ यांची मागणी

पुणे – महानगरपालिकेच्या वतीने अनेक महापालिकेच्या विविधा उद्यानामध्ये व विरंगुळा केंद्रामध्ये महापालिकेच्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या वतीने साहित्यीक कट्टा चालविले जातात. या साहित्यीक कट्टाच्या माध्यामातुन नवोदित साहित्यीक लेखक, कलावंत, कवी, यांना मुक्त व्यासपीठ निर्माण करुन दिलेले आहे. हे साहित्यिक कट्टे तातडीनं सुरू करण्यात यावेत अशी मागणी महापालिकेच्या विरोधीपक्षनेत्या दिपाली धुमाळ यांनी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्याकडे केली आहे.

या साहित्यीकांच्या माध्यमातुन मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी व अनेक साहित्यीक लेखक, कवी व कलावंत निर्माण करण्याच्या दुष्टीकोनातुन या साहित्यीक कट्ट्यांच्या उपयोग होत आहे. गेल्या कोरोनाच्या दिड वर्षाच्या कालावधीत हे सर्व साहित्यीक कट्टे बंद होते. परंतु आता महाराष्ट्र सरकारने उद्याने व सार्वजनिक विरंगुळा केंद्र, नाट्यगृह व सिनेमागृह सुरु करण्याच्या संदर्भात सुचना दिलेल्या आहेत. याच दुष्टीने हे सा·हित्यीक कट्टे सुध्दा सुरु करणे गरजेचे आहे.प्रलंबित असलेले पुरस्कार तातडीने प्रदान करण्यात यावे अशी मागणी धुमाळ यांनी केली आहे.