Annabhau Sathe Vikas Mahamandal | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी मेळाव्याचे आयोजन

HomeपुणेBreaking News

Annabhau Sathe Vikas Mahamandal | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी मेळाव्याचे आयोजन

कारभारी वृत्तसेवा Nov 20, 2023 12:53 PM

Aashadhi Wari 2025 | सर्व विभागांच्या समन्वयातून ‘आषाढी वारी’ यशस्वी करा | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश | आषाढी एकादशीच्या अनुषंगाने पूर्वतयारी आढावा
 Substantial increase of 10 thousand rupees in the stipend of resident doctors!
Commission for Backward Classes to start survey on war footing from January 23

Annabhau Sathe Vikas Mahamandal | साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे महामंडळाच्या योजनांच्या लाभासाठी मेळाव्याचे आयोजन

 

Annabhau Sathe Vikas Mahamandal |  साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे विकास महामंडळामार्फत मातंग व तत्सम समाजाकरीता राबविण्यात येणाऱ्या योजनांचा प्रसार व प्रचार करण्यासोबत लाभ देण्यासाठी मंगळवार २१ नोव्हेंबर रोजी सकाळी ११:३० वा. सांस्कृतिक सभागृह, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, येरवडा येथे मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

महामंडळामार्फत मांग, मातंग, मिनी-मादीग, मादींग, दानखणी मांग, मांग महाशी, मदारी, राधेमांग, मांग गारुडी, मांग गोराडी, मादगी व मादिगा या जातीतील नागरिकांसाठी विविध योजना राबविण्यात येतात. पुणे व सातारा जिल्ह्यातील या समाजघटकांसाठी महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ पोहोचण्याकरिता मेळाव्याचे आयोजन केले आहे.

या मेळाव्यामध्ये राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्यक विभागाचे सचिव सुमंत भांगे, महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मनीष सांगळे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक सुनिल वारे, महामंडळाचे महाव्यवस्थापक अनिल म्हस्के आदी मार्गदर्शन करणार आहेत. तरी समाजातील अधिकाधिक नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक शिवाजी मांजरे यांनी केले आहे.