PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा |  The Karbhari ने उचलून धरला होता विषय

HomeBreaking Newsपुणे

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा | The Karbhari ने उचलून धरला होता विषय

कारभारी वृत्तसेवा Nov 08, 2023 3:45 PM

Old Pension Scheme | जुन्या पेन्शन योजनेबाबत सकारात्मक | विधानसभा निवडणुकीपूर्वी निर्णय घेणार
ITI Training Center Yerawada | MLA Sunil Tingre | येरवडा येथे होणार आयटीआय प्रशिक्षण केंद्र
Pune Metro News | रुबी हॉल ते रामवाडी मेट्रोला झेंडा | पिंपरी चिंचवड ते निगडी मेट्रोचे भूमिपूजन

PMPML Employees Diwali Bonus | पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात दिवाळी बोनस जमा |  The Karbhari ने उचलून धरला होता विषय

PMPML Employees Diwali Bonus  | पुणे महापालिका कर्मचाऱ्यांना महापालिकेकडून दिवाळीची भेट देत बोनस देण्यात आला आहे. दरम्यान दिवाळी तोंडावर आली तरीही पीएमपीच्या कर्मचाऱ्यांना मात्र अजूनही बोनस देण्यात आलेला नव्हता. याबाबतचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांच्या टेबलवर गेल्या 15 दिवसापासून पडून होता. याबाबत The Karbhari ने या विषयाला वाचा फोडली होती. यामुळे पालकमंत्र्यांनी यात लक्ष घालत बोनस देण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज संध्याकाळी पीएमपी कर्मचाऱ्यांच्या खात्यात बोनस जमा झाला आहे. यामुळे कर्मचाऱ्यांना आनंदात दिवाळी साजरी करता येणार आहे. (PMPML Pune News)
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडील (PMPML) सर्व कायम, बदली सेवकांना सानुग्रह अनुदान ८.३३% व बक्षिस  २१०००/- दिवाळीपूर्वी देण्याची मागणी कर्मचाऱ्यानी ने पीएमपीच्या सीएमडी (PMPML CMD) कडे केली होती.   दरम्यान परवाच पुणे महापालिका सेवकांना (PMC Employees) बोनस देण्यात (Bonus) आला आहे. त्याचप्रमाणे पीएमपी सेवकांना दिलासा दिला जाणार का, असा प्रश्न पीएमपी कर्मचारी विचारत होते. (PMPML Employees Diwali Bonus)
पुणे महापालिका आणि पिंपरी महापालिका संचलन तुटीच्या माध्यमातून पीएमपी कर्मचाऱ्यांना बोनस देतात. पीएमपी कडून याचे प्रस्ताव दोन्ही महापालिकाना देण्यात आले आहेत. दरम्यान पुणे महापालिका प्रशासनाकडून याबाबतचा प्रस्ताव तयार करून मान्यतेसाठी आयुक्ताकडे पाठवण्यात आला आहे. मात्र गेल्या 15 दिवसापासून आयुक्तांच्या टेबलवर हा प्रस्ताव तसाच पडून होता. त्यामुळे कर्मचाऱ्यांना दिवाळीच्या आधी बोनस मिळणार कि नंतर असा प्रश्न उपस्थित होत आहे. याबाबत लवकर निर्णय करण्याची मागणी पीएमपी कर्मचारी करत होते. याबाबत The karbhari ने आवाज उठवल्यानंतर तात्काळ सूत्रे हालली. पालकमंत्री अजित पवार यांनी यात लक्ष घालत प्रशासनाला बोनस देण्याचे आदेश दिले. त्यानुसार कर्मचाऱ्यांना बोनस मिळाला आहे.
दरम्यान याबाबत पीएमटी कामगार इंटक संघटनेने देखील याबाबत पाठपुरावा केला होता. तसेच संघटनेच्या वतीनं याबाबत पालकमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी शहर अध्यक्ष दीपक मानकर, शिवसेना शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे आणि प्रशासनाचे आभार मानले आहेत.
—-