PMC Kharadi STP Plant | पुणे महापालिकेच्या खराडी एसटीपी प्लांट चे अजितदादाकडून कौतुक!
PMC Kharadi STP Plant | पुणे | पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) वतीने खराडी परिसरात मैलापाणी शुद्धीकरण केंद्र (Storm Water Treatment Plant) अर्थात एसटीपी प्लांट निर्माण करण्यात आला आहे. याची आज उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पाहणी केली. प्लांट मधून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याचे अजित दादांकडून कौतुक करण्यात आले. अशाच पद्धतीने सर्व प्लांट मध्ये काम व्हायला हवे, अशा सूचना पवार यांनी महापालिका प्रशासनाला दिल्या. (PMC Pune)
उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी शहरातील विविध विकास कामाची पाहणी केली. महापालिका प्रशासना कडून जायका प्रकल्पाचे (PMC JICA Project) काम हाती घेण्यात आला आहे. त्या माध्यमातून शहरात 11 एसटीपी प्लांट निर्माण करण्यात येणार आहेत. त्यातील एक प्लांट खराडी परिसरात निर्माण करण्यात येणार आहे. याची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री पवार आले होते. हा प्रकल्प 30 MLD चा असणार आहे. सद्यस्थितीत या प्रकल्पाच्याच शेजारी महापालिकेचा 40 MLD चा शुद्धीकरण प्रकल्प आहे. याची पाहणी अजित पवार यांनी केली. शुद्धीकरण प्रकल्पातून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्याची शुद्धता त्यांनी तपासली. शुद्ध पाणी नदीत सोडले जात असल्याबद्दल अजित दादांनी महापालिका प्रशासनाचे कौतुक केले. तसेच अशाच पद्धतीने सर्व शुद्धीकरण केंद्राचे काम व्हायला हवे, अशा सूचना प्रशासनाला केल्या.
यावेळी महापालिका आयुक्त विक्रम कुमार, नगर अभियंता प्रशांत वाघमारे, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमनार, रवींद्र बिनवडे, तसेच महापालिकेचे कर्मचारी उपस्थित होते.
—–