महागाई विरोधात श्राद्ध घालून आंदोलन
: राष्ट्रवादी महिला कॉंग्रेस आक्रमक
पुणे : घरगुती गॅस मध्ये 15 रूपयांनी झाली. या वाढलेल्या महागाई विरोधात प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी च्या वतीने सातत्याने आंदोलन करून महागाई विरोधात आवाज उठवत असते. सर्वसामान्य नागरिकांचे यामध्ये जगणे मुश्किल झाले आहे. याच धर्तीवर “श्राद्ध” घालून आंदोलन करण्यात आले
मोदी सरकार विरोधात संताप
मोदी सरकारने एलपीजी सिलेंडरच्या किमतीत वाढ करून महागाईमुळे जनतेचे कंबरडे मोडले आहे. याच्याच निषेधार्थ आज राष्ट्रवादी महिला काँग्रेस च्या वतीने महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. त्याच पार्श्वभूमीवर आज अलका टॉकीज चौक येथे आंदोलन करण्यात आले.
देशाला महागाईचे कारण देवून सत्ता काबीज केलेल्या मोदी सरकारनेच मात्र आता महागाईमुळे जनतेचे जगणे मुश्किल केले आहे. केंद्र सरकारने पुन्हा एकदा घरगुती गॅस चे भाववाढ केली आहे.या आंदोलनात भाजपच्या जनविरोधी धोरणांचा निषेध व्यक्त केला. पेट्रोल, डिझेल व घरगुती एलपीजी गॅसच्या वाढत्या किंमतीने जनता हैराण झाली आहे. या आंदोलनादरम्यान मोदी सरकार विरोधात तीव्र संताप व्यक्त करण्यात आला.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, महिला शहराध्यक्षा मृणालिनी वाणी, सर्व विधानसभा अध्यक्ष, प्रभाग अध्यक्ष तसेच पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून सरकारचा निषेध व्यक्त केला.
COMMENTS