Water Consumption Discipline for Punekar | पुणेकरांना पाणी वापराची शिस्त लावणार महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग!

HomeपुणेBreaking News

Water Consumption Discipline for Punekar | पुणेकरांना पाणी वापराची शिस्त लावणार महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग!

Ganesh Kumar Mule Sep 23, 2023 7:59 AM

PMC Scholarship For 10th, 12th Student | 10 वी, 12 वी शिष्यवृत्ती योजनांसाठी 10841 अर्ज | सूचना करूनही 2669 अर्ज save as draft मध्ये! 
PMC Pune Employees | लेखनिकी संवर्गावर अन्याय होत असल्याची पुणे मनपा कर्मचाऱ्यांची खंत
Rain | Dams | धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने पाणीसाठ्यात वाढ 

Water Consumption Discipline for Punekar | पुणेकरांना पाणी वापराची शिस्त लावणार महापालिकेचा पाणीपुरवठा विभाग!

| विभाग प्रमुखांचे सर्व अधीक्षक अभियंत्यांना आदेश

Water Consumption Discipline for Punekar पुणे | पुणेकरांना पाणी वापराची शिस्त नाही, असे पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला (PMC Water Supply Department) वाटते. त्यामुळे विभागाकडून पुणेकरांना पाणी वापराबाबतची शिस्त (Water Consumption Discipline for Punekar) लावण्यात येणार आहे. पाणी पुरवठा विभाग प्रमुखांनी (HOD) याबाबतचे आदेश सर्व अधिक्षक अभियंता (Superintendent Engineer) यांना दिले आहेत. दरम्यान पाणीपुरवठा विभाग प्रमुखांच्या या आदेशामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Pune Municipal Corporation)
पुणेकरांना पाणी वापराबाबत शिस्त अशी टीका याआधी बऱ्याच राजकीय व्यक्तीकडून केली जात होती. काही सामाजिक संस्था देखील यात आघाडीवर आहेत. त्यामुळे आता पुणे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाला (PMC Pune Water Supply Department) देखील वाटू लागले आहे कि पुणेकरांना पाणी वापराची शिस्त लावणे गरजेचे आहे. याबाबत छावा स्वराज्य सामाजिक संस्थेचे अध्यक्ष रामेश्वर घायतिडक यांनी महापालिका पाणीपुरवठा विभागाकडे तक्रार केली होती. पुणेकरांकडून बऱ्याच ठिकाणी पाणी वापर योग्य पद्धतीने होत नाही, त्यामुळे महापालिका प्रशासनाकडून पुणेकरांना शिस्त लावण्याचे काम हाती घ्यावे. असे तक्रारीत म्हटले होते. त्यानुसार पाणीपुरवठा विभाग प्रमुखांनी याबाबतचे आदेश काढले आहेत. पर्वती, लष्कर, एसएनडीटीच्या अधिक्षक अभियंता हे आदेश देण्यात आले आहेत. त्यात म्हटले आहे कि पुणेकरांना पाणी वापराबाबतची शिस्त लावण्यात यावी.  पाणीपुरवठा विभाग प्रमुखाच्या आदेशाला पुणेकर कितपत स्वीकारणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
-—-
News Title | The Water Supply Department of Pune Municipal Corporation will discipline Pune residents for water consumption! Orders of the Heads of Departments to all Superintending Engineers