Pune Metro Property Tax | पुणे मेट्रो कडून मेट्रो स्टेशनची माहिती पुणे महापालिकेला मिळेना | प्रॉपर्टी टॅक्स निर्धारण करण्यात महापालिकेला अडचणी
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) हद्दीत मेट्रो रेल स्टेशन कार्यान्वित करण्यात आलेले आहेत. केंद्र सरकारच्या मिळकतींची आकारणी केंद्र शासनाने निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार भांडवली मूल्यावर (Capital Value) केली जाते. तसेच राज्य शासनाच्या मिळकतींची आकारणी चटई क्षेत्रावर (FSI) केली जाते. या कामी पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील कार्यान्वित मेट्रो रेल स्टेशन मिळकतीना पुणे
महानगरपालिकेचे (Pune Municipal Corporation) सेवाशुल्क आकारणी करणे आवश्यक आहे. त्याअनुषंगाने मेट्रो स्टेशनचे नाव, वापरातील क्षेत्रफळ, भांडवली मूल्य इत्यादी संपूर्ण माहिती कर आकारणी कार्यालयाकडे सादर करणेबाबत महापालिकेकडून मेट्रोला 2022 मध्ये कळविण्यात आलेले आहे. तथापि, अद्याप कोणतीही माहिती महापालिकेला प्राप्त झालेली नाही. त्यामुळे महापालिकेने पुन्हा मेट्रोला स्मरणपत्र दिले. कारण मिळकती आकारणीसाठी पात्र असल्याने मिळकत कर आकारणी आवश्यक आहे. याबाबत वेळोवेळी विस्तारीत होणाऱ्या मेट्रो स्टेशन बाबतची संपूर्ण माहिती टॅक्स विभागाला द्यावी असे पत्रात म्हटले आहे. मात्र पुणे मेट्रोने महापालिकेला कसलाही प्रतिसाद दिलेला नाही. यावरून मेट्रोची उदासीनता दिसून येत आहे.