Krushi Sevak Bharti Maharashtra | कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

HomeBreaking Newssocial

Krushi Sevak Bharti Maharashtra | कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Ganesh Kumar Mule Sep 12, 2023 3:28 PM

Padma Award | महाराष्ट्रातील पाच मान्यवरांना ‘पद्म पुरस्कार’ प्रदान
अक्षय तृतीयेच्या दिवशी सह दुय्यम निबंधक कार्यालये सुरु ठेवण्याचे नोंदणी महानिरीक्षक यांचे आदेश
One Day Salary | सर्व सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा एक दिवसाचा पगार कापला जाणार

Krushi Sevak Bharti Maharashtra | कृषी सेवक पदभरती साठी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra |  कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट क संवर्गातील कृषी सहायकांची रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही पदे कृषी सेवक म्हणून एकत्रित मानधनावर स्पर्धापरीक्षेद्वारे भरण्यासाठी पात्र उमेदवारांनी ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन विभागीय कृषी सहसंचालक र.शा. नाईकवाडी यांनी केले आहे. (Krushi Sevak Bharti 2023 Maharashtra)
कृषी आयुक्तालयाच्या ११ सप्टेंबर २०२३ च्या जाहिरातीनुसार पात्र उमेदवारांनी www.krishi.maharashtra.ov.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत. अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्याबाबतच्या सुचना, अर्ज करण्याचा कालावधी याबाबत सविस्तर माहिती वरील संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असे श्री. नाईकवाडी यांनी कळविले आहे.
0000
News Title | Krushi Sevak Bharti Maharashtra | Applications are invited for Krishi Sevak Recruitment till 3rd October