पुणे मेट्रो प्रकल्पासाठी निर्मित ट्रेन कोचचे मुंबईत आगमन
:एकूण तीन कोच
पुणे : पुणे मेट्रोसाठी ३४ मेट्रो ट्रेनची ऑर्डर टिटागढ फिरेमा(Titagarh Firema) या कंपनीला देण्यात आली आहे. प्रत्येक ट्रेन मध्ये३ कोच असणार आहेत. त्यामुळे टिटागढ फिरेमा हि कंपनी १०२ कोचपुणे मेट्रोसाठी बनवुन पुरवठा करणार आहेत. मेट्रोशी झालेल्याकरारानुसार पहिल्या काही ट्रेन ह्या टिटागढ फिरेमाच्या इटली येथीलकारखान्यामध्ये तयार होणार आहेत. व उर्वरित ट्रेन कोलकत्ता येथे तयारहोणार आहेत. बुधवारी इटलीत तयार झालेली पहिली ट्रेन (३ कोच असलेली) मुंबई बंदरात दाखल झाली आहे. समुद्रमार्गे आलेली ट्रेन जहाजावरुन उतरवून ट्रक वर लादण्यात आल्या आहेत. कस्टम आणि इतर बाबींची पुर्तता केल्यानंतर ट्रेन लवकरच पुण्यात दाखल होणार आहेत. अशी माहिती मेट्रो कडून देण्यात आली.
:उर्जेची होणार बचत
पुणे मेट्रोसाठी बनवण्यात येणाऱ्या टिटागढ फिरेमा कंपनीच्या कोचया ऑल्युमिनियम धातूपासून बनविण्यात आल्या आहेत. त्या वजनाने हलक्या असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात ऊर्जेची बचत होणार आहे. तसेचत्यांना कमी देखभालीची गरज पडणार आहे. एका कोचची लांबी २९ मी.असणार आहे. तसेच कोचची उंची ११.३० मी. असणार आहे. कोचचीअधिकतर रुंदी २.९ मी. असणार आहे.
एका कोचची प्रवासी आसनक्षमता ३२० असणार आहे. आणि संपूर्ण३ कोच ट्रेन ची प्रवाशी क्षमता ९७० पेसेंजर असणार आहे. प्रत्येक कोचमध्ये ४४ लोकांना बसण्याची व्यवस्था असेल. कोचचा अधिकतमवेग ९० किमी. प्रति तास असणार आहे. ३ कोचच्या ट्रेन मध्ये एक डब्बामहिलांसाठी राखीव असणार आहे. त्याचप्रमाणे दिव्यांग जणांसाठी २व्हीलचेअर साठी राखीव जागा असणार आहे. या ट्रेनमध्ये जागतिकदर्जाच्या सर्वोत्तम प्रणालींचा वापर करण्यात आला आहे. एअरकंडिशनिंग, सीसीटीव्ही, प्रवांशाच्या सुरक्षिततेसाठी पॅनिक बटण, आपातकालीन द्वार, प्रवासी उद्घोषणा प्रणाली, दरवाजे उघडताना व बंदहोताना दृश्य आणि श्राव्य संकेत प्रणाली असणार आहेत.
उर्वरित २ ट्रेनचे बनविण्याचे काम इटलीतील टिटागढ फिरेमाकारखान्यात चालू असून लवकरच ते देखील भारतात पाठविण्यात येणारआहेत. याप्रांसगी महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षितयांनी म्हटले आहे कि , “पुणे मेट्रोसाठी बनविण्यात आलेल्या ट्रेन याजागतिक दर्जाच्या, अत्याधुनिक, वजनाने हलके व ऊर्जेची बचतकरणाऱ्या असणार आहेत.”
COMMENTS