Chandrayaan 3 Landing | भारत जगातील पाचवा शक्तिशाली देश | मोहन जोशी

HomeपुणेBreaking News

Chandrayaan 3 Landing | भारत जगातील पाचवा शक्तिशाली देश | मोहन जोशी

Ganesh Kumar Mule Aug 23, 2023 2:05 PM

Pune Rain | BJP Vs NCP | राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या गैरकारभाराची पुणेकरांना शिक्षा | भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांचा आरोप
Lok Sabha Election Results | मोदींचा हा नैतिक पराभव – पृथ्वीराज चव्हाण
कसबा पोटनिवडणुक | छोट्या पक्षांचा पाठिंबा मिळविण्यावर काँग्रेस, भाजपचा भर

Chandrayaan 3 Landing | भारत जगातील पाचवा शक्तिशाली देश | मोहन जोशी

Chandrayaan 3 Landing | आर्यभट्ट चंद्रयान तीन उपग्रह चंद्रावर यशस्वीपणे लँड झाल्यामुळे भारत जगात पाचवा शक्तिशाली देश बनला आहे. अशा भावना काँग्रेस नेते मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी व्यक्त केल्या. (Chandrayaan 3 Landing)
इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी केलेली मेहनत व उत्तम कामगिरीमुळे आज भारत देशाने आपला चंद्रयान तीन उपग्रह यशस्वीपणे चंद्रावर उतरवले आहे. काँग्रेस पक्षाचे कार्यकर्त्यांनी टिळक रोड येथील चौकामध्ये पुणेकरांना यानाची प्रतिकृती तयार करून , साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला. हातात तिरंगा झेंडा घेत यानाची प्रतिकृती घेंवून काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आनंदाने रस्त्यावरील येणार जाणाऱ्या  साखर वाटप होते यावेळी भारत माता की जय ,वंदे मातरम अशा घोषणा देण्यात आल्या.
 यावेळी मनोगत आपले व्यक्त करताना महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी म्हणाले की साऱ्या देशाला अभिमान वाटेल असे कार्य भारतीय शास्त्रज्ञांनी केले आहे.आतापर्यंतच्या कार्यात वैज्ञानिकांचा मोठा वाटा आहे .चंद्रयान तीन उपग्रह यशस्वी लँडिंग मुळे भारताच्या अंतराळ संशोधनाला वेगळी दिशा व बळ मिळालें आहे ,शिवाय आंतरराष्ट्रीयपातळीवर ही भारताचा बहुमान वाढला आहे .आर्यभट्ट चंद्रयान तीन च्या यशस्वी लँडिंग मुळे भारत जगातला पाचवा शक्तिशाली देश बनला आहे.
आमदार रवींद्र धंगेकर यावेळी  म्हणाले की पंडित जवाहरलाल नेहरू त्यांनी इस्त्रोची स्थापना केली आणि भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर होमी भाभा आणि डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या नेतृत्वाखाली भारतीय शास्त्रज्ञांनी अफाट मेहनत करून 19 एप्रिल 1975 रोजी आर्यभट उपग्रहाचा यशस्वी लँडिंग चंद्रावर झाले.
शास्त्रज्ञांचा मी मनापासून अभिनंदन करतो.
यावेळी रमेश अय्यर ,नुरुद्दीन सोमजी ,प्रथमेश आबनावे ,स्वाती शिदे ,प्राची दुधाने, शानी  नौशाद ,चेतन अग्रवाल ,सुरेश कांबळे, शाबीर खान ,आयुब पठाण ,अविनाश अडसूळ, राजू नाणेकर, बबलू कोळी ,डॉक्टर गिरीजा शिंदे ,वैशाली मेहंदळे ,शाकीब आबाजी  गोरख पळसकर ,राहुल सुपेकर, तिलेश मोटा ,महेंद्र चव्हाण ,अश्फाक शेख ,उमेश काची , किरण म्हात्रे ,नरेंद्र चव्हाण ,दिपक रेणुसे ,अनिल धिमधमे उपस्थित होते