Manipur Violence | NCP Pune | मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे राष्ट्रवादी काँग्रेस कडून निषेध आंदोलन
Manipur Violence | NCP Pune | मणिपुरमध्ये महिलांवर सुरू असलेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कडून निषेध आंदोलन करण्यात आले. (Manipur Violence | NCP Pune)
यावेळी शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) म्हणाले, स्त्रीला “देवी “म्हणून पुजा करणाऱ्या आपल्या भारत देशात सुमारे ७० दिवसांपासून मणिपूरमध्ये महिलांवर अत्याचार होत आहेत. देशाची राजसत्ता उपभोगत जगभर डंका पिटनारे मोदी सरकार मात्र हातावर हात ठेऊन बसले आहे. (Manipur News)
जगताप पुढे म्हणाले, भारतात महिला आणि मुली सुरक्षित नाहीत त्यांच्यावर सतत अत्याचार व जीवघेणे हल्ले होत आहेत. ज्या लोकांचा मतांवर आपण सत्ता उपभोगत आहात, ज्यांच्या टॅक्सच्या पैश्यावर हा देश चालतो, त्या लोकांची जर आपण रक्षा करू शकलो नाही, तर हे आपण चालवत असलेल्या शासनाचे अपयश आहे, अशा प्रकारे शासन करणाऱ्या चालविणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो. (Manipur Violence News)
या आंदोलनास शहराध्यक्ष प्रशांत जगताप,काकासाहेब चव्हाण, डॉ.सुनील जगताप, मृणालिनीताई वाणी,सुषमा सातपुते,शिल्पाताई भोसले, किशोर कांबळे,विक्रम जाधव,उदयजी महाले, आप्पासाहेब जाधव,गणेश नलावडे,अजिंक्य पालकर,रोहन पायगुडे,फहीम शेख,मंगेश मोरे,हेमंत बधे,सर्व सेल अध्यक्ष, कार्याध्यक्ष, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—-
News Title | Manipur Violence | NCP Pune | Protest movement by Pune Nationalist Congress to protest the ongoing oppression of women in Manipur