PMC Pune Bharti Results | फायरमन पदाच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी महापालिकेकडून छाननी पथक नियुक्त
PMC Pune Bharti Results | पुणे महापालिकेकडून (Pune Municipal Corporation) 320 पदांची भरती प्रक्रिया (PMC Recruitment) राबवण्यात येत आहे. यातील सर्वच पदांचे नुकतेच निकाल घोषित करण्यात आले आहेत. त्यानुसार आता प्रमाणपत्रांची पडताळणी करण्यात येणार आहे. फायरमन (Fireman) पदांच्या पात्र उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यासाठी 30 लोकांचे छाननी पथक म्हणजे 10 टीम तयार करण्यात आल्या आहेत. तर या टीमवर नियंत्रण ठेवण्यासाठी 7 पर्यवेक्षक नियुक्त करण्यात आले आहेत. दरम्यान उमेदवारांनी १९ ते २१ जुलै या कालावधीत पडताळणी साठी सकाळी १० वाज्लेपासून महापालिकेत उपस्थित राहायचे आहे. (PMC Pune Bharti Results)
पुणे महानगरपालिकेच्या (PMC Pune) आस्थापनेवरील श्रेणी – १ ते श्रेणी- ३ या संवर्गातील रिक्त पदे सरळसेवेने भरणेकरीता ०६/०३/२०२३ रोजी जाहिरात देऊन ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले आहेत. जाहिरातीनुसार प्राप्त अर्जातील महाराष्ट्रातील एकूण ५ शहरांमध्ये वेगवेगळ्या परिक्षा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा IBPS संस्थे मार्फत घेण्यात आली आहे. IBPS संस्थेकडून पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. सदर ऑनलाईन परीक्षेमध्ये उमेदवारांनी प्राप्त केलेल्या गुणांच्या आधारे गुणवत्तेनुसार अंतिम निवड यादी प्रसिद्ध करणे कामी संबंधित उमेदवारांची शैक्षणिक व इतर अर्हता / पात्रतेबाबतची मूळ प्रमाणपत्रे / कागदपत्रांची तपासणी करणेकामी खालीलप्रमाणे छाननी पथक नियुक्त करण्यात आले आहे. अग्निशमन विमोचक / फायरमन श्रेणी – ३ या पदासाठी मुख्य अग्निशमन अधिकारी श्री देवेंद्र पोटफोडे (अग्निशमन विभाग ) यांचे नियंत्रणाखाली 10 पथकांनी प्रमाणपत्रे / कागदपत्रांच्या पडताळणीचे कामकाज करावयाचे आहे. असे आदेशात म्हटले आहे. (Pune Mahanagarpalika Bharti 2023)