Pune Akashvani Update | पुणे आकाशवाणी वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती

HomeपुणेBreaking News

Pune Akashvani Update | पुणे आकाशवाणी वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती

Ganesh Kumar Mule Jun 15, 2023 12:27 PM

Pune 10th Ranking | Pune 5 Star City | स्वच्छ सर्वेक्षण च्या ऑल इंडिया रँकिंग मध्ये पुणे 20 वरून 10 व्या स्थानावर
Pramod Nana Bhangire | महंमदवाडी परिसरात होणार 122 कोटींचे डीपी रस्ते | नागरिकांची वाहतूक कोंडीतून होणार सुटका 
BJP Pune | पुणे शहर भाजपची पाच लाख सदस्यांची नोंदणी | शहराध्यक्ष धीरज घाटे यांची माहिती

Pune Akashvani Update | पुणे आकाशवाणी वृत्तविभाग बंद करण्याच्या निर्णयाला स्थगिती

| खासदार प्रकाश जावडेकर यांची माहिती

Pune Akashvani Update | पुणे आकाशवाणी (Pune Akashvani) वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णयाला केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर (Union Minister Anurag Thakur) यांनी स्थगिती दिली आहे. याबाबत महाराष्ट्र आणि पुण्यातून खूप विरोध झाला होता. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. (Pune Akashvani Update)
खासदार प्रकाश जावडेकर (MP Prakash Javadekar) यांनी ठाकूर यांच्याशी संपर्क साधून या संदर्भात चर्चा केली. तसेच प्रसार भारतीचे (Prasar Bharti) अपूर्व चंद्र आणि मुख्य कार्यकारी अधिकारी द्विवेदी यांच्याशीही जावडेकर यांची चर्चा झाली आहे.
पुणे आकाशवाणी वरून प्रसारित होणाऱ्या बातम्यांचे युनिट औरंगाबादला हलवण्याचा निर्णय रद्द करावा या संदर्भात जावडेकर यांनी चर्चा केली. त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. असे जावडेकर यांच्या कार्यालयातून सांगण्यात आले. (Akashvani Pune News)
दरम्यान काँग्रेस चे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी याबाबत खासदार जावडेकर यांना डिवचले होते. खासदार सुप्रिया सुळे (MP Supriya Sule) यांनी देखील निर्णय रद्द करण्याची मागणी प्रधानमंत्री कार्यालयाकडे केली होती. तसेच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील अनुराग ठाकूर यांच्याकडे याबाबत मागणी केली होती.
—-
News Title | Pune Akashvani Update | Suspension of decision to close Pune Akashvani news department