Pune Municipal Corporation | कोर्ट केसेस दाखल करण्यास विलंब न करण्याबाबत महापालिका गंभीर | मोहीम राबवली जाणार 

HomeBreaking Newsपुणे

 Pune Municipal Corporation | कोर्ट केसेस दाखल करण्यास विलंब न करण्याबाबत महापालिका गंभीर | मोहीम राबवली जाणार 

Ganesh Kumar Mule Jun 14, 2023 2:19 PM

7th Pay Commission | सप्टेंबर संपला, ऑक्टोबर आला तरी फरकाची रक्कम मिळेना | गेल्या चार महिन्यांत 100 बिले देखील तयार झाली नाहीत 
Water problem | Baner, Balewadi, Pashan, Soos, Mhalunge | बाणेर, बालेवाडी, पाषाण, सूस, म्हाळुंगेचा पाणी प्रश्न तात्काळ सोडवा | भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या महापालिका प्रशासनाला सूचना
PMC encroachment action | महापालिकेकडून आंबेगाव बुद्रुक मध्ये अनधिकृत बांधकामावर कारवाईचा धडाका सुरूच 

 Pune Municipal Corporation | कोर्ट केसेस दाखल करण्यास विलंब न करण्याबाबत महापालिका गंभीर | मोहीम राबवली जाणार

| सर्व विभागाकडून मागवली माहिती

Pune Municipal Corporation | महापालिकेच्या (PMC Pune) विविध विभागाशी संबंधित कोर्ट प्रकरणे असतात. यामध्ये महापालिकेला कोर्टात पार्टी केले जाते. मात्र विभागाकडून माहिती वेळेत माहिती मिळत नसल्याची तक्रार विधी विभागाकडून (PMC law Department) केली जाते. यामुळे दावे वेळेत दाखल करण्यासाठी आता महापालिका याबाबत एक मोहीम राबवणार आहे. दोन दिवसाच्या मोहिमेत दाव्यांची सर्व माहिती विधी विभागाकडे सादर करावी लागणार आहे. (Pune Municipal Corporation)

पुणे महानगरपालिकेतील (Pune Municipal Corporation) विविध विभागाकडील कोर्ट केसेस (Court Cases) विषयक कामकाज विधी विभागाकडून पाहिले जाते. ज्या विभागांनी, खात्यांनी त्यांच्याशी संबंधित दाखल दाव्यांचे पॅरावाईज माहिती व कागदपत्रे अद्यापही विधी विभागाकडे सादर केलेले नाहीत अशा विभागांनी / त्यांच्याशी संबधित दाखल कोर्ट केसेसचे पॅरावाईजबाबतची सर्व कागदपत्रे व तपशीलवार इत्यंभूत माहिती विधी विभागाकडे देण्यासाठी २२/०६/२०२३ व २३/०६/२०२३ रोजी दोन दिवस मोहीम राबविण्यात येणार आहे. संबंधित खात्यांच्या नोडल ऑफिसर्सनी  २२/०६/२०२३ व २३/०६/२०२३ रोजी सकाळी ११.०० वा. ते सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत सहाय्यक विधी अधिकारी कक्ष,० येथे तातडीच्या कोर्ट केसेसची यादी सादर करावी. जेणेकरून केस दाखल करणेस विलंब होणार नाही तसेच पुणे महानगरपालिकेस कोणत्याही प्रकारची तोशीस लागणार नाही. या बाबत संबंधित खाते प्रमुख यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. असे आदेश महापालिका अतिरिक्त आयुक्त (PMC Additional Commissioner) यांनी दिले आहेत.
News title | Pune Municipal Corporation | Municipal Corporation serious about not delaying filing of court cases The campaign will be implemented