Woman Movement: पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

Homeपुणेमहाराष्ट्र

Woman Movement: पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

Ganesh Kumar Mule Sep 28, 2021 3:19 PM

Loksabha Election 2024 Results | मतमोजणी केंद्रावर विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती
Contract Employees | कंत्राटी कामगारांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत 5 एप्रिलला कामगार युनियनचा मोर्चा
PMC Joint Municipal Commissioner |  मुख्य उद्यान अधीक्षक अशोक घोरपडे यांना सह महापालिका आयुक्त असे नामभिधान देण्यास मंजुरी | खातेप्रमुख संवर्गात दहा वर्षापेक्षा जास्त सेवा केलेल्या खातेप्रमुखांचे नामभिधान ‘सह महापालिका आयुक्त (जॉइंट म्युनिसिपल कमिशनर)’ करण्यास मान्यता  

पुणेकर महिलांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर आक्रोश आंदोलन

: महिलांवरील वाढत्या अन्याय – अत्याचाराचा विरोध

पुणे:  महिलांवर वाढत असलेले अन्याय अत्याचाराचा निषेध करण्यासाठी पुणे शहरातील विविध पक्ष संघटनाच्या प्रमुख महिलांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रोश करून आंदोलन करण्यात आले.

: विविध पक्ष संघटनेच्या महिला सहभागी

या आंदोलनात पुणे शहरातील विविध पक्ष संघटनेच्या महिला सहभागी झाल्या होत्या .यावेळी राज्य सरकार व केंद्र सरकार कडून नवीन अतिशय कडक कायदा करण्याची मागणी निवेदनातून जिल्हाधिकारी राजेश देशमुख  यांच्याकडे करण्यात आली .यावेळी अत्याचार करणाऱ्या  व्यक्तींचा प्रतीकात्मक पुतळा करून त्याला जोडे मारण्यात आले.
          अत्याचाऱ्याला शिक्षा झालीच पाहिजे,बंद करा बंद करा महिलांवरील अन्याय बंद करा,शक्ती कायदा तत्काळ लागू करा यासह महिलांनी  विविध घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता.  या आंदोलनातील प्रमुख मागण्या ,महिला अत्याचार करणाऱ्या नराधमासाठी  कडक कायदा करण्यात यावा. रेल्वे स्थानकावर दामिनी मार्शलच्या धर्तीवर महिला पोलीस पथक निर्माण करावे. प्रत्येक रेल्वे, बस स्थानकावर सी.सी.टि.व्ही.बसविण्यात यावा. रात्री प्रीपेड रिक्षा सेवा करावी व त्यांची तपासणी वारंवार करण्यात यावी. पीडित महिलांना मदतीसाठी निर्भया कक्ष उभारण्यात यावा. राज्य महिला आयोगावर तत्काळ नेमणुका कराव्या यासारख्या अनेक मागण्यांचे निवेदन  जिल्हाधिकारी यांना यावेळी देण्यात आले.
         या आंदोलनात,बहुजन युवा फाउंडेशन च्या अध्यक्षा आरती साठे, रिपब्ल्लिकन पार्टी ऑफ इंडिया महिला आघाडी पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संगीता आठवले ,नगरसेविका पुजा मनिष आनंद ,काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संगीता तिवारी, भीम छावा अध्यक्ष निलम गायकवाड, रिपब्लिकन युवा मोर्चा महिला प्रदेशाध्यक्ष सुवर्णा डबाळे ,निशा सूक्रे ,विशाखा गायकवाड, शोभना पनिकर,प्रियंका मधाले, सरोज त्रिपाठी, रमा भोसले, कांता ढोरे यासह विवध पक्ष, संघटनाच्या प्रमुख महिला उपस्थित होत्या.