विद्यापीठ खुले केल्याबद्दल कुलगुरूंचा सत्कार
: प्रकाश ढोरे व सुनील माने यांचा उपक्रम
पुणे: पुणे विद्यापीठ सर्वसामान्य जनतेसाठी व्यायाम आणि वाॅकसाठी खुले केल्याबद्दल पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॅा. नितीन करमाळकर यांचे आभार मानत आज सत्कार केला. ज्येष्ठ विधीज्ञ आणि विद्यापीठांत अनेक वर्षे चालण्यासाठी येणारे ॲड. एस. के. जैन सर यांच्या हस्ते हा सत्कार केला. विद्यापीठ खुले करण्यासाठी मी केलेल्या प्रयत्नांचे ॲड. जैनसरांनी मन:पूर्वक कौतुक करीत शाबासकीची थाप दिली.
या कामात महत्त्वाची भूमिका पार पाडणारे रजिस्ट्रार डॅा. प्रफुल्ल पवार सर यांचेही आभार मानले. यावेळी उपकुलगुरू डॅा. उमराणी सर यावेळी उपस्थित होते.
कालपासून लोकांनी विद्यापीठाच्या आवारात फिरण्यास आणि व्यायामास येणे सुरू केले आहे. मी काही लोकांना भेटल्यानंतर त्यांना उत्साही, स्वच्छ आणि आनंदी वातावरणात व्यायाम व वॅाक करण्याची पुन्हा सुरूवात झाल्याचे मोठे समाधान दिसले.
या कामाचे समाधान मोठे आहे.
कोरोनाची तीव्रता कमी कमी झाली असल्याने शाळा, प्रार्थना स्थळे आणि सिनेमागृहेही सुरू होत असताना, लोकांचे आरोग्य सांभाळणारे व्यायाम व मैदाने खुली व्हावीत यासाठी मी व्यक्तिशः व्यायामप्रेमी म्हणून आणि भाजपाचा पदाधिकारी म्हणून आग्रही आहे. सर्वांना आरोग्यदायी आणि आनंदी जगण्यासाठी शुभेच्छा.
COMMENTS