PMC Pune property tax | PT 3 अर्ज कुठे जमा करायचा? आवश्यक कागदपत्रे कुठली? जाणून घ्या सर्व काही

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune property tax | PT 3 अर्ज कुठे जमा करायचा? आवश्यक कागदपत्रे कुठली? जाणून घ्या सर्व काही

Ganesh Kumar Mule May 08, 2023 1:50 PM

PMC PT 3 Form | Tomorrow is the last day to file PT-3 application form
PMC Deputy Commissioner | उपायुक्त माधव जगताप यांच्याकडे कर आकारणी तर महेश पाटील यांच्याकडे सामान्य प्रशासन विभागाचा अतिरिक्त पदभार!
PT 3 Form | Pune Property Tax | PT-3 अर्ज भरून देण्याची मुदत 30 नोव्हेंबर पर्यंत | पुणेकरांना दिलासा

PMC Pune property tax | PT 3 अर्ज कुठे जमा करायचा? आवश्यक कागदपत्रे कुठली? जाणून घ्या सर्व काही

PMC pune Property Taxपुणे महापालिकेने (pmc pune) मिळकत करात ४० टक्के सवलत मिळवण्यासाठी पीटी ३ हा (PT 3 Application form) अर्ज भरून महापालिकेकडे जमा करावा लागणार असल्याने तो अर्ज महापालिकेच्या संकेतस्थळावर (PMC pune Website) उपलब्ध करून दिला आहे. हा अर्ज भरून महापालिकेच्या क्षेत्रीय कार्यांलयांसह नागरी सुविधा केंद्र येथे जमा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.   या अर्जासोबत कुठली कागदपत्रे जोडावी लागणार आहेत. हे आपण जाणून घेऊया. (PMC pune property Tax)

 

मिळकतधारकांच्या सोयीच्या दृष्टीने PT-३ अर्ज (PT 3 Application form) आपल्या नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय येथे नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक यांचेकडे जमा करता येणार आहे. दि. ०१.०४.२०१९ पूर्वीच्या ज्या निवासी मिळकतीना ४०% सवलत देण्यात आली आहे, ज्यांची सवलत आजही कायम आहे त्यांनी पुन्हा PT-३ अर्ज भरण्याची आवश्यकता नाही. (PMC pune news)
४०% सवलतीकरिता PT- ३ अर्ज संपर्क कार्यालय / क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय येथील नागरी सुविधाvकेंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचे कार्यालयात उपलब्ध होणार आहेत तसेच
propertytax.punecorporation.org ह्या संकेतस्थळावर देखील फॉर्म उपलब्ध करून देण्यात आला आहे. (Pune Municipal Corporation)

सवलत प्राप्त करणेकरिता PT-३ अर्जासोबत लागणारी आवश्यक कागदपत्रे:

१) मिळकतीचा वापर स्वत: राहण्यासाठी करित असल्याबाबत सोसायटीचे नाहरकत पत्र (सोसायटी असल्यास)
२) मतदान ओळखपत्र / पासपोर्ट/वाहनचालक परवाना/ गैस कार्ड / रेशनकार्ड इ.
३) पुणे शहरात अन्य ठिकाणी मिळकत असल्यास त्या मिळकतीच्या मिळकतकराच्या बिलाची प्रत
(PT 3 application form)
PT-३ अर्जासोबत वरील सक्षम पुराव्याचे कागदपत्रे व २५ रु. चलन फी भरून नजीकच्या संपर्क कार्यालय/क्षेत्रिय कार्यालय/मुख्य कार्यालय / नागरी सुविधा केंद्र किंवा पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचेकडे अर्ज जमा केलेनंतर पेठ निरीक्षक / विभागीय निरीक्षक यांचेकडून कागदपत्रांची तपासणी करून करआकारणी व करसंकलन प्रमुख यांचेकडून प्रकरण अंतिम करणेत येईल.
अजित देशमुख, उपायुक्त, कर आकारणी व कर संकलन विभाग