PMC Pune Property Tax Bill | 15 मे पासून मिळकत कराची बिले दिली जाणार | 5-10% सवलतीचा कालावधी 31 जुलै पर्यंत 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Property Tax Bill | 15 मे पासून मिळकत कराची बिले दिली जाणार | 5-10% सवलतीचा कालावधी 31 जुलै पर्यंत 

Ganesh Kumar Mule May 04, 2023 1:55 PM

Mahatma Gandhi Jayanti | PMC Pune | पुणे महापालिकेकडून उत्कृष्ट काम करणाऱ्या सफाई सेवकांचा सत्कार
National Commission For Scavengers | Pay attention to the strict implementation of the Prevention of Scavengers Act  | Dr.  P.  P.  Wawa 
PMC Pune Solid waste management | दक्षिण गोलार्धातील देशांच्या प्रतिनिधींनी घनकचरा व्यवस्थापन यंत्रणेचे कौतुक करणे ही चांगली बाब | महापालिका आयुक्त विक्रम कुमार

PMC Pune Property Tax Bill | 15 मे पासून मिळकत कराची बिले दिली जाणार

| 5-10% सवलतीचा कालावधी 31 जुलै पर्यंत

PMC Pune Property Tax Bill | पुणे महानगरपालिकेकडून (PMC pune) निवासी मिळकतींना (Residential Property) स्वःवापराकरिता देण्यात येणारी ४०% सवलत कायम राहणार आहे. ०१.०४.२०१९ पूर्वीच्या निवासी व बिगरनिवासी मिळकतींना (Non residential property) देखभाल दुरुस्ती करिता देण्यात येणारी १५% वजावट रद्द करून १०% वजावट देण्यात येणार असून त्यांची अंमलबजावणी ०१.०४.२०२३ पासून करण्यात येणार आहे . अशा मिळकतींची सन २०२३-२४ करिताची देयके (property Tax Bill) १५.०५.२०२३ पासून देण्यात येणार आहेत. नागरिकांना ऑनलाईन बिले तात्काळ मिळतील. त्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. अशी माहिती  महापालिका अतिरिक्त आयुक्त डॉ कुणाल खेमणार (Additional commissioner Dr Kunal Khemnar) यांनी दिली. (PMC pune property Tax bill)

महापालिकेकडून देण्यात आलेल्या निवेदनानुसार ज्या नव्याने बांधकाम झालेल्या निवासी मिळकतींची आकारणी ४०% सवलत न देता ०१.०४.२०१९ पासून पुढे झालेली आहे त्या सर्व मिळकतींना व ज्या मिळकतींची ४०% सवलत जी.आय.एस. सर्व्हे अंतर्गत ०१.०४.२०१८ पासून रद्द करण्यात आली आहे व अशा मिळकतींना ह्यापूर्वी फरकाची देयके पाठवण्यात आली होती अशा सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता देण्यात येणार आहे.  मिळकतींचे सन २०२३-२४ ह्या आर्थिक वर्षाची देयके ३१.०५.२०२३ पर्यंत बनवण्यात येणार आहेत. वरील सर्व मिळकतींना ४०% सवलतीचा लाभ आकारणी दिनांक/दुरुस्ती दिनांकापासून (म्हणजेच ज्या निवासी मिळकतींना  ०१.०४.२०१८ पासून ३१.०३.२०२३ पर्यंत सवलत देय आहे परंतु दिली गेलेली नाही) ती सवलत घेणेकरिता व देण्यात आलेली सवलत दि. ०१.०४.२०२३ पासून पुढील कालावधीकरिता सुरु राहणेकरिता मिळकतधारकाने PT-३ अर्ज संपूर्ण पुराव्यांसह दि. १५ नोव्हेंबर २०२३ पूर्वी कर आकारणी व कर संकलन खात्याकडे सादर करणे आवश्यक राहील. संबंधित मिळकतधारकांनी संपूर्ण मिळकतकर भरला असल्यास जादा जमा होणारी रक्कम PT-३ अर्ज भरून दिलेनंतर पुढील ४ वर्षांचे समान हप्त्यात आर्थिक वर्षाच्या देयकातून समायोजित करण्यात येईल. विहित मुदतीत अर्ज सादर न केल्यास मिळकतीचा वापर मिळकतधारक स्वःवापराकरिता करीत नसल्याचे गृहीत धरून अशा मिळकतीची सन २०२३-२४ करिता दिली गेलेली सवलत रद्द करण्यात येईल. (Pune Municipal Corporation property tax)
महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमाचे कलम १४०-अ अन्वये विहित मुदतीत संपूर्ण मिळकतकर भरणाऱ्या मिळकतधारकास सर्वसाधारण करात ५% किंवा १०% सवलत देण्यात येते. त्या सवलतीचा कालावधी ३१.०७.२०२३ अखेरपर्यंत देण्यात आला आहे. १५.०८.२०२३ पासून प्रथम सहामाहीस महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम परिशिष्ठ ‘ड’ कराधान नियम प्रकरण ८ मधील नियम ४१ नुसार दरमहा २% शास्ती आकारण्यात येईल. असे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. (Pmc Pune news)