PMC Pune Medical College News | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या आकृतिबंधास राज्य सरकारची मंजूरी 

HomeBreaking Newsपुणे

PMC Pune Medical College News | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या आकृतिबंधास राज्य सरकारची मंजूरी 

Ganesh Kumar Mule May 03, 2023 1:56 PM

Conference on ‘Urban Infrastructure’ | जी-20 निमित्त पुण्यात ‘शहरी पायाभूत सुविधा’ या विषयावर परिषद
PMC Projects | पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी घेतला पुणे महानगरपालिकेच्या प्रकल्पांचा आढावा
Employment Fair | बेरोजगार युवकांच्या हाताला मिळाले काम | माजी उपमहापौर डॉ. सिद्धार्थ धेंडे यांच्या पुढाकारातून रोजगार मेळाव्याचे आयोजन

PMC Pune Medical College News | पुणे महापालिकेच्या मेडिकल कॉलेजच्या आकृतिबंधास राज्य सरकारची मंजूरी

| 535 पदाचा आकृतिबंध व सेवाप्रवेश नियमावलीस मान्यता

PMC Pune Medical College News: (Author – Ganesh Mule) पुणे महानगरपालिका (Pune Municipal Corporation) वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (Medical education trust) चे भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय पुणे (Bharatratna Atalbihari Vajpeyi Medical College pune) हे पुर्ण क्षमतेने सुरू झालेले असून सद्यस्थितीत महाविद्यालयात २०० विद्यार्थी MBBS चे शिक्षण घेत आहेत. वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आवश्यक असणाऱ्या NMC च्या मार्गदर्शक सूचनेनुसार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी पदभरती बाबत पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्टने मान्यता दिली आहे.  त्यानुसार वैद्यकीय महाविद्यालयाचे आवश्यक 535 पदांचा आकृतिबंध व सेवाप्रवेश नियम तयार करून नगर विकास विभाग महाराष्ट्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठविणेत आलेले होते. त्यास महाराष्ट्र शासनाची नुकतीच मान्यता मिळालेली आहे. त्यामुळे आता वैद्यकीय महाविद्यालयाची उर्वरित पदे भरणेकामी नियमित जाहिरात मागविणेचा मार्ग मोकळा झाला आहे. (Pune Municipal Corporation Medical College)

: आकृतिबंधाचा प्रस्ताव महापालिका आयुक्तांनी मंजूरीसाठी पाठवला होता

पुणे महानगरपालिकेमार्फत भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे सुरू करण्यासाठी पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट स्थापन करण्यास सरकारकडून  मंजूरी देण्यात आलेली आहे. तसेच पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (PMC-MET) संस्थेचे नियम व नियमावली (करारनामा) करण्यात आलेले आहे. (Pune Mahanagarpalika Medical College News)

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (PMC-MET) संचलित भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे या संस्थेस शंभर विद्यार्थी प्रवेश क्षमतेचे वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यास राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग (NMC), नवी दिल्ली यांची  मान्यता प्राप्त झालेली आहे. त्यास  वैद्यकीय शिक्षण व द्रव्ये विभागाने दि.१६.०३.२०२२ रोजीच्या शासन निर्णयान्वये मंजूरी दिलेले आहे. (Pmc Pune Medical College)

पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (PMC-MET) या संस्थेचे नियम व नियमावलीतील (करारनामा)  शासनाचे अधिनियम, नियम, अधिसूचना संस्थेवर बंधनकारक आहे. पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट संचालक मंडळाने आकृतिबंध  व सेवाप्रवेश नियमास मान्यता दिलेली आहे. त्यास अनुसरून  आयुक्त, पुणे महानगरपालिका यांचा पुणे महानगरपालिका वैद्यकीय शिक्षण ट्रस्ट (PMC-MET) भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी वैद्यकीय महाविद्यालय, पुणे आकृतीबंध व सेवाप्रवेश नियमास  मान्यता मिळणेबाबतचा प्राप्त झालेला प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार यास मान्यता देण्यात आली आहे. (PMC pune news)

– किती पदाचा आहे आकृतिबंध?

याबाबत मेडिकल कॉलेज चे डीन डॉ आशिष बंगीनवार (PMC Pune Medical college dean Dr Ashish Banginwar) यांनी सांगितले कि एकंदर 535 पदाच्या आकृतिबंधास राज्य सरकारकडून मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये 202 पदे नियमित असतील. यामध्ये 99 पदे ही शिक्षकांची तर 103 पदे ही शिक्षकेतर असतील. तर त्रयस्थ भरली जाणारी 303 पदे ही शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची आहेत. डॉ बंगीनवार यांच्या माहितीनुसार सद्यस्थितीत मेडिकल कॉलेज ची तिसरी बॅच सुरु आहे. त्यासाठी काही पदे भरण्यात आली होती. मात्र ही पदे अपुरी आहेत. मात्र आता सरकारच्या मंजुरीमुळे सगळी पदे भरण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लवकरच याबाबत महापालिका आणि ट्रस्ट च्या समन्वयाने प्रक्रिया सुरु केली जाईल.