Ajit Pawar | Rajgad | पुणे जिल्हयातील या तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी 

HomeपुणेBreaking News

Ajit Pawar | Rajgad | पुणे जिल्हयातील या तालुक्याचे नामांतरण “राजगड” करण्याची अजित पवारांची मागणी 

Ganesh Kumar Mule Apr 27, 2023 2:26 PM

NCP president Sharad Pawar | शरद पवार यांना महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे महत्व का आहे? 
GBS Outbreak | GBS चा प्रादुर्भाव असणाऱ्या गावात पाईपलाईन च्या माध्यमातून पाणी देण्याची मागणी  | माजी नगरसेवकांनी पालकमंत्री अजित पवार यांच्याकडे केली मागणी 
PMPML Pune | Need to get new buses in PMPL’s fleet! – Former MLA Mohan Joshi
पुणे | पुणे जिल्ह्यातील (Pune District) वेल्हे तालुक्याचे (Taluka Velhe) नाव राजगड (Rajgad) करावे, अशी मागणी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Opposition leader) यांनी केली आहे. याबाबत मुख्यमंत्री (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री (DCM Devendra Fadnvis) यांना अजित पवार (Ajit pawar) यांनी पत्र दिले आहे. (Rajgad)
(Ajit Pawar’s demand to change the name of Velhe taluka in Pune district to “Rajgad”)
अजित पवार यांच्या पत्रानुसार  पुणे जिल्हयातील वेल्हे तालुक्याचे नामांतरण राजगड तालुका करणेबाबत लोकभावना तीव्र आहेत. याबाबत जिल्हा परिषद पुणे यांचे २२.११.२०२१ रोजीच्या सर्वसाधारण सभेत ठराव करुन वेल्हे तालुक्यातील ७० ग्रामपंचायतीपैकी ५८ ग्रामपंचायतींना वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करणेबाबत सकारात्मक ठराव दिले आहे. वेल्हे तालुक्यामध्ये स्थित असलेल्या राजगड या किल्ल्याशी तालुक्यामधील तमाम नागरिकांचे जिव्हाळयाचे संबंध असून सदर किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराज
यांची प्रथम राजधानी असलेने सदर ठिकाणावरुन छत्रपती शिवाजी महाराज यांनी २७ वर्षे शासन चालविले असल्याने वेल्हे तालुक्याचे नामकरण राजगड असे करण्यात यावे अशी वेल्हे तालुक्यातील नागरिकांची तीव्र इच्छा आहे. (Opposition Leader Ajit pawar)
पवार यांनी पुढे म्हटले आहे कि वेल्हे तालुका हा शिवकालीन व ऐतिहासिक वारसा असलेला आणि किल्ले मालिकेतील किल्ले राजगड व किल्ले तोरणा असे दोन महत्वपूर्ण किल्ले समाविष्ट असलेला तालुका आहे. या तालुक्याचे जुने दस्त पाहता किल्ले तोरणाचे नाव प्रचंडगड या नावाने तालुक्याची ओळख होती. तथापी, सदर तालुक्याचे मुख्य ठिकाण हे वेल्हे बु. घेरा या ठिकाणी असलेने तालुक्याचे नाव वेल्हे असे नमूद आहे. वेल्हे तालुक्यातील तमाम नागरिकांच्या भावना या राजगड किल्ल्याशी जोडलेल्या असून छत्रपती शिवाजी महाराजांची प्रथम राजधानी या तालुक्यामध्ये स्थित असल्याने किल्ले राजगड वरुन या तालुक्याचे नामकरण “राजगड” करणेबाबतच्या प्रस्तावास मान्यता देण्यात यावी. असेही पवार यांनी म्हटले आहे. (Ajit Pawar)